- ऋजुता लुकतुके
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ गटवार साखळीतच गारद झाला. त्यानंतर खेळाडू अमेरिकेत असताना मोहम्मद रिझवानचं एका चाहत्याबरोबर जोरदार भांडणही झालं. या सगळ्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळ गांभीर्याने विचार करत आहे. संघात आणि संघ प्रशासनात काही बदल तर होतीलच. शिवाय खेळाडूंसाठी दौऱ्यावर असताना आचार संहिताही लागू असेल. (PCB in Action Mode)
पाक खेळाडू विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत आपल्या पत्नीला घेऊन आले होते. शिवाय विश्वचषक सुरू असताना खेळाडूंनी काही प्रमोशनल कार्यक्रमातही भाग घेतला. त्याचं उट्टं आता बोर्डाकडून निघण्याची शक्यता आहे. पाक बोर्डाचे नवीन अध्यक्ष मोहसीन नकवी संघातील काही पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. शिस्त पालन किती महत्त्वाचं आहे हे खेळाडूंना पटवून देण्यात अधिकार कमी पडले, असं नकवी यांना वाटतंय. (PCB in Action Mode)
(हेही वाचा – Shambhuraj Desai : पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे)
दौऱ्यावर जाणाऱ्या पाक संघासाठी आता नवीन आचारसंहिता आणली जाईल, हे जवळ जवळ निश्चित आहे. खेळाडूंनी मैदानातील कामगिरीला सर्वाधिक प्राधान्य द्यावं, याकडे पाक बोर्ड खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याविषयीची बातमी दिली आहे. ‘पाक खेळाडूंनी फक्त आपली पत्नी आणि मुलांनाच दौऱ्यावर नेलं नाही. तर काही खेळाडू आई-वडील आणि इतर नातेवाईकांना घेऊनही आले होते आणि हे नकवींना रुचलेलं नाही,’ असं पीटीआयने पीसीबी मधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. टी-२० विश्वचषकातील कामगिरीचा आढावा घेण्यात यावा आणि त्यानंतर सगळ्यांच्या चुका निश्चित करून त्यावर कारवाई आणि अंमलबजावणी व्हावी असा नकवी यांचा प्रयत्न असेल. (PCB in Action Mode)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community