- ऋजुता लुकतुके
पहिल्या डावांत भारतीय संघाने सगळे मिळून दीडशे धावा केल्या होत्या. त्याच संघाने दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या डावांत एकही गडी न गमावता दीडशे धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील फलंदाजांचं अपयश बदली कर्णधार जसप्रीत बुमराहने २४ धावांत ५ बळी घेत झाकलं. त्याच्या कामगिरीमुळे भारताला पहिल्या डावांत आघाडीही मिळाली आणि ही आघाडी पुढे वाढवली ती यशस्वी जयस्वाल आणि के. एल. राहुलने. बुमराह पर्थमध्ये पाच बळी घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. पण, या ५ बळींसाठी त्याने षटकामागे फक्त १.७ धावा दिल्या. त्यामुळे इतर गोलंदाजांमध्ये तो उजवा आहे. (Perth Test, 2nd Day)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)
Captains to take 5-wicket hauls in a Test innings at Perth :-
5/89 – Bishan Singh Bedi 🇮🇳 in 1977
5/89 – Bishan Singh Bedi 🇮🇳 in 1977
5/74 – Courtney Walsh 🏝️ in 1997
5/30 – Jasprit Bumrah 🇮🇳 today#JaspritBumrah𓃵 #AUSvIND pic.twitter.com/k3fcmSWdek— 𝐀𝐔𝐑𝐀 ɪᴄᴛ 🇮🇳 (@ICTFANNNN) November 23, 2024
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत गुंडाळल्यानंतर मात्र दुसऱ्या डावांत फलंदाजांनी मागे वळून बघितलं नाही. पहिल्या डावांत शून्यावर बाद झालेल्या जयस्वालने शनिवारी आपलं नववं कसोटी अर्धशतक झळकावलं. राहुलच्या साथीने त्याने भारतीय संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या २४ वर्षांतील भारतीय संघाने दिलेली ही सर्वोत्तम सलामी आहे. यापूर्वी २००४ मध्ये विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांनी १२३ धावांची सलामी दिली होती.
भारतीय जोडी सध्या नाबाद आहे आणि त्यांना एक नवीन विक्रमही खुणावत आहे. कारण, सुनील गावस्कर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी केलेली १९१ धावांची सलामी ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. तो विक्रम मोडण्यासाठी दोघांना १९ धावांची गरज आहे. (Perth Test, 2nd Day)
(हेही वाचा – हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम सलामी
१९१ – सुनील गावस्कर व क्रिस श्रीकांत (सिडनी, १९८६)
१६५ – चेतन चौहान व सुनील गावस्कर (१९८१)
१४१ – विरेंद्र सेहवाग व आकाश चोप्रा (२००३)
१२४ – विनू मंकड व सरवटे (१९४८)
१२३ – विरेंद्र सेहवाग व आकाश चोप्रा (२००४)
१७२* – यशस्वी जयस्वाल व के. एल. राहुल (२०२४)
पर्थ कसोटीतील खेळपट्टी अचानक सुरुवातीपेक्षा संथ झाली आहे. त्यामुळे फलंदाजांना धावा करणं तुलनेनं सोपं जात आहे. अशावेळी सामन्याचे तीन दिवस अजून बाकी आहेत. भारताकडे नेमकी किती आघाडी हवी हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मिळवलेलं वर्चस्व भारताला वाढवावं लागणार आहे. (Perth Test, 2nd Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community