- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा व्यावसायिक आणि त्याचवेळी लढवय्या संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कसोटीच्या एका दिवसावर जरी प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजवता आलं तरी संघ भरून पावतो. पर्थ कसोटीची शेवटची ४ सत्र भारतीय संघासाठी अशी भारावलेली होती. एकतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव भारताने १०४ धावांतच संपवला. त्यानंतर कालची ऑप्टस मैदानाची खेळपट्टी ही हीच का असं वाटावं अशी फलंदाजी दुसऱ्या डावांत केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत खेळपट्टी उन्हामुळे खरंच संथ झाली होती. त्याचा फायदा उचलत जयसवाल आणि के. एल. राहुल यांनी चक्क नाबाद १७७ धावांची सलामी भारताला करून दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसानंतर पर्थ कसोटीवर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. भारताचे दहा गडी अजून बाकी आहेत. (Perth Test, 2nd Day)
पर्थची खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी कलाटणीच पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी इथं १७ बळी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ३ बळी गेले. पण, पुढील दोन सत्र जयसवाल आणि राहुल यांनी खेळून काढली. एकही बळी गेला नाही आणि याचा फायदा सध्या तरी भारतीय संघाला मिळताना दिसत आहे. (Perth Test, 2nd Day)
That’s Stumps on Day 2 of the first #AUSvIND Test!
A mighty batting performance from #TeamIndia! 💪 💪
9⃣0⃣* for Yashasvi Jaiswal
6⃣2⃣* for KL RahulWe will be back tomorrow for Day 3 action! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/JA2APCmCjx
— BCCI (@BCCI) November 23, 2024
(हेही वाचा – हिंदुत्व सोडून संजय राऊत यांच्या नादी लागणे केवढ्याला पडले; Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
पहिलं सत्र सुरू झालं तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ ७ बाद ६७ धावांवर होता. पण, ॲलेक्स कॅरीला कालच्याच धावसंख्येवर बुमराहने बाद केलं. बुमराहचा डावातील हा पाचवा बळी होता. शेवटच्या दोन ऑस्ट्रेलियन जोड्यांनी मात्र भारताची थोडीफार परीक्षा पाहिली. खासकरून स्टार्कने २६ धावा करत धावसंख्या शंभरच्या वर नेली. शेवटचा बळी स्टार्कच ठरला. आणि पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियन डाव १०४ धावांवर संपला. भारताला पहिल्या डावांत ४६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. बुमराहने ५ तर हर्षित राणाने ३ बळी मिळवले. (Perth Test, 2nd Day)
त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल ही भारतीय जोडी दुसऱ्या डावात मैदानात उतरली आणि पुढची दोन सत्र त्यांनी अगदी सहज खेळून काढली. जयस्वाल नेहमीप्रमाणे आक्रमक होता आणि तो ९० धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत २ षटकार आणि ११ चौकार ठोकले आहेत. तर राहुलही ६२ धावांवर नाबाद आहे. त्याने ४ चौकार लगावले आहेत. स्टार्क आणि हेझलवूडच्या काही चेंडूंनी दोघांना सतावलं. पण, त्याशिवाय दोघांनी अगदी मनमुराद फलंदाजी केली. परदेशात भारतीय सलामीवीरांनी मागच्या २४ वर्षांत केलेली ही पहिली शतकी सलामी आहे. कसोटीचे ३ दिवस अजून बाकी आहेत. (Perth Test, 2nd Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community