मॅच सुरु होण्यापूर्वीच आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यापासून तिकिटांचा गोंधळ समोर आला होता. स्पर्धेतील पहिलीच मॅच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर झाली. मात्र ही लढत पाहण्यासाठी फार कमी लोक स्टेडियममध्ये उपस्थित होते. यावरून बीसीसीआयला ट्रोल देखील करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मैदानात अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. आता वर्ल्डकपमधील या तिकीट विक्रीच्या गोंधळाचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. (World Cup 2023 )
८ ऑक्टोबर रोजी भारताच्या पहिल्या मॅचवेळी देखील तिकिट वाटपातील गोंधळ समोर आला होता. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत ऑनलाईन तिकीट संपल्याचे दाखवले जात होते आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील वर्ल्डकपमधील लढत २९ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी आकारण्यात आलेल्या दरातील तफावतीवरून अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की लखनौमध्ये होणाऱ्या ५ मॅचच्या तिकिटांसाठी ४९९ इतका दर आकारला जाईल. मात्र या नियमाला अपवाद करण्यात आला तो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना होय. या लढतीसाठी बीसीसीआयने तिकाटांचा दर जास्त म्हणजेच ३ हजार २५० इतका ठेवलाय.तिकीट दरातील या तफावतीवरून विपुल त्रिपाठी या व्यक्तीने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
एका रिपोट्स नुसार सुरुवातीला तिकिटांचे दर १ हजार ५०० इतके करण्यात आले होते. मात्र नंतरत्यात अचानक वाढ करण्यात आली आणि ते ३ हजार २५० इतके करण्यात आले. विशेष म्हणजे ही तिकिटे अद्याप विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाहीत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, बीसीसीआय याची जबाबदारी घेऊन तोडगा काढावा असे म्हटले आहे.
(हेही वाचा : Caste Census : त्यांना हिंदू एकत्र येण्याची भीती; आशिष शेलार यांची टीका)
लखनौमध्ये प्रथमच आयसीसी वर्ल्डकपमधील मॅच होत आहे. त्यामुळे ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, त्यांना भारताची मॅच पाहण्यासाएठी ४९९ हून अधिक दराने तिकीट खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी तिकिटांचे दर निश्चित करण्यासाठी कोणताही एक नियम लागू न केल्याचा आरोप देखील या जनहित याचिकेत करण्यात आला आहे. बीसीसीआयने मागील सामन्यांप्रमाणे तिकिटांच्या किमती ४९९ रुपयांपर्यंत खाली करावेत अशी विनंती याचिकेत केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community