Pink – Ball Warm up Game : ऑस्ट्रेलियातील एकमेव सराव सामन्यातून समोर आलेल्या चांगल्या बाजू, कच्चे दुवे

Pink - Ball Warm up Game : पंतप्रधानांच्या संघाबरोबरचा हा सामना भारताने ५ गडी राखून आरामात जिंकला

68
Pink - Ball Warm up Game : ऑस्ट्रेलियातील एकमेव सराव सामन्यातून समोर आलेल्या चांगल्या बाजू, कच्चे दुवे
Pink - Ball Warm up Game : ऑस्ट्रेलियातील एकमेव सराव सामन्यातून समोर आलेल्या चांगल्या बाजू, कच्चे दुवे
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला बोर्डर – गावसकर चषक मालिकेत आता ॲडलेड इथं दिवस – रात्र कसोटी खेळायची आहे. त्यापूर्वीची सरावाची संधी म्हणून कॅनबेरा इथं झालेल्या पंतप्रधानांच्या संघाबरोबरचा सामना भारतीय संघाने आरामात ५ गडी राखून जिंकला आहे. शनिवारचा अख्खा दिवस आणि रविवारीही सकाळचे काही तास पावसामुळे वाया गेल्यानंतर प्रत्येकी ४६ षटकांचा सामना खेळण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला होता. भारताने नाणेफेक जिंकून पंतप्रधान संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. संध्याकाळी प्रकाशझोतात फलंदाजीचा सराव मिळावा हा स्पष्ट हेतू त्यामागे होता. (Pink – Ball Warm up Game)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील निवडणुकांचा अन्वयार्थ)

विशेष म्हणजे बुमराच्या अनुपस्थितीत सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांनी पंतप्रधानांच्या संघाला २४० धावांतच सर्वबाद केलं. त्यातही ४४ धावांत ४ बळी मिळवणारा हर्षित राणा अव्वल ठरला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सरावाची संधी सोडली नाही. बोलंड, आणि लॉईड पोप यांना सोडलं तर प्रतिस्पर्धी संघात एकही नावाजलेला गोलंदाज नव्हता. पण, भारतीय संघाने सरावाची संधी सोडली नाही. शुभमन गिल (५०), राहुल (२७), यशस्वी जयसवाल (४५), नितिश रेड्डी (४२) आणि वॉशिंग्टन सुंदर (४२) यांनी धावा केल्या. हा प्रदर्शनीय सामना होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी धावसंख्या पार होऊनही भारतीय संघाने फलंदाजी सुरूच ठेवली.४६ षटकांत ५ बाद २५७ धावा केल्या. (Pink – Ball Warm up Game)

भारतीय संघासाठी या सामन्यातून समोर आलेली वैशिष्ट्य बघूया, 

रोहित, सर्फराझ अपयशी – पर्थ कसोटीला मुकलेला रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलियात सामन्याचा सराव करण्याची ही एकमेव संधी होती. ६ डिसेंबरला ॲडलेड कसोटी सुरू होत आहे. पण, रोहित ११ चेंडूंत ३ धावा करून झटपट बाद झाला. चुकीचा फटका खेळण्याची त्याची सवय पुन्हा एकदा घातक ठरली. तर पर्थ कसोटीत अंतिम अकरामध्ये नसलेला सर्फराझला शेवटची किमान ४ षटकं खेळण्याची संधी होती. तो ही चमक दाखवू शकला नाही. (Pink – Ball Warm up Game)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील निवडणुकांचा अन्वयार्थ)

गिल, नितिश, सुंदर चमकले – दुखापतीनंतर संघात परतलेल्या शुभमन गिलने ६२ चेंडूंत ५० धावांची खेळी करताना आपला फॉर्म दाखवून दिला. मैदानाच्या चारही बाजूला तो फटके खेळू शकत होता. दुखापतीच्या बाबतीतही त्याला वेदना जाणवलेल्या दिसल्या नाहीत. तर नितिश रेड्डीनेही पर्थमधलाच आपला बाणा कायम ठेवला. मधल्या फळीत अष्टपैलू म्हणून तो चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही सूर गवसला आहे.  (Pink – Ball Warm up Game)

विराट, अश्विन, बुमरा यांची विश्रांती – विराट, बुमरा आणि अश्विन या भारताच्या प्रमुख खेळाडूंनी या सामन्यातून विश्रांती घेतली. पण, ते सामन्याच्या वेळात नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसले. खासकरून विराटने बुमरा आणि अश्विन यांच्या गोलंदाजीवर काही तास फलंदाजीचा सराव केला.  (Pink – Ball Warm up Game)

(हेही वाचा- हिंदू तरुणी ठरली साबिरच्या Love Jihad ची शिकार; आधी अत्याचार मग गोमांस खाण्यास जबरदस्ती)

हर्षितचे ६ चेंडूंत ४ बळी – पर्थ कसोटी ही हर्षितसाठी पदार्पणाची कसोटी होती. तिथेही त्याने गोलंदाजीतील चमक दाखवून दिली होती. आता कॅनबेरामध्येही त्याने ६ षटकांत ४४ धावा देत ४ बळी मिळवले. विशेष म्हणजे हे चार बळी त्याने ६ चेंडूत मिळवले. यातील २ त्रिफळाचीत होते. (Pink – Ball Warm up Game)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.