- ऋजुता लुकतुके
हॉकी संघात गोलकीपरची भूमिका महत्त्वाची असते. एकतर फुटबॉलच्या मैदानापेक्षा हे मैदान छोटं आणि चेंडूची हालचाल तर कैक पटींनी वेगवान. त्यामुळे गोलजाळं तुलनेनं छोटं असलं तरी गोलकीपरचं काम मोलाचं असतं. गोली या जाळ्यासमोर सतत नाचत असतो. इकडून तिकडे झेपावत असतो. हॉकीत गोलीचं नृत्य हा वाक्प्रचार रुढच झालेला आहे. (PR Sreejesh Retires)
भारतीय संघासाठी असा प्रगल्भ नाच पी आर श्रीजेश मागची दोन दशकं करतोय. भारताकडून तो ३२८ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तीनदा त्याने ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि एक कांस्य पदकही जिंकलं आहे. आता तो चौथं ऑलिम्पिक खेळायला सज्ज झाला आहे. पण, त्याचवेळी त्याने एक घोषणाही केली आहे. ‘मी माझ्या शेवटच्या नृत्यासाठी तयार होतोय आणि त्याचवेळी माझ्या भूतकाळाकडे अभिमानाने बघतोय. भविष्य आशा लावून आहे. आता थांबायची वेळ आली आहे,’ असं श्रीजेशने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (PR Sreejesh Retires)
As I stand on the threshold of my final chapter in international hockey, my heart swells with gratitude and reflection. This journey has been nothing short of extraordinary, and I am forever grateful for the love and support from my family, teammates, coaches, and fans. pic.twitter.com/MqxIuTalCY
— sreejesh p r (@16Sreejesh) July 22, 2024
(हेही वाचा – Union Budget 2024 : रोजगार, कृषि कर्ज आणि उद्योगांना चालना; नवीन अर्थसंकल्पात कुणासाठी किती तरतूद?)
निवृत्ती जाहीर करतानाच त्याने आपले कुटुंबीयं, चाहते आणि संघ सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारीही पूर्ण असल्याचं त्याने म्हटलं आहे. २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकचा अनुभव हा आपला मैदानावरील सर्वोत्तम अनुभव होता हे सांगायलाही तो विसरला नाही. २००६ च्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेत तो पहिल्यांदा भारताकडून खेळला. त्यानंतर तो कायम भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. २०१४ चं आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्ण, २०१८ मध्ये जकार्तात मिळवलेलं कांस्य आणि २०२२ मध्ये राष्ट्रकूल रौप्य पदक विजेत्या संघात तो होता. (PR Sreejesh Retires)
१८ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने महत्त्वाचे पुरस्कारही पटकावले. २०२१ मध्ये त्याला देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न देऊन त्याचा गौरव करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेनंही त्याला २०२१ आणि २०२२ मध्ये सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार प्रदान केला. (PR Sreejesh Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community