Praggnanandhaa : विश्वनाथन आनंदला मागे टाकून प्रग्यानंदा भारताचा अव्वल बुद्धिबळपटू

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत प्रग्यानंदाने विश्वविजेत्या डिंग लिरेनला हरवून भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मानही मिळवला आहे. 

270
R Praggnanandhaa : आर प्रग्यानंदाची मॅग्नस कार्लसनवर मात, सुपरबेट चषक स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर झेप
  • ऋजुता लुकतुके

१८ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रग्यानंदाने बुद्धिबळातील एकेक शिखर सर करणं सुरूच ठेवलं आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत आधी त्याने विश्वविजेत्या डिंग लिरेनला काळ्या मोहऱ्यांनी हरवलं. आणि हे करतानाच त्याने बुद्धिबळाच्या क्रमवारीत विश्वनाथन आनंदलाही मागे टाकण्याची किमया केली. त्यामुळे प्रग्यानंदा आता आनंदच्याही वर बुद्धिबळातील अव्वल भारतीय झाला आहे. (Praggnanandhaa)

डिंग बरोबरचा सामना संपल्यानंतर प्रग्यानंदानेच या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘मी हा सामना पटकन बरोबरीत सोडवेन असं मला वाटलं होतं. पण, अचानक लिरेनसाठी गोष्टी कठीण होत गेल्या. मी त्याचं एक जास्तीचं प्यादं मारलं तोपर्यंत सामना बरोबरीत सुटेल, असंच मला वाटलं होतं,’ असं सामन्यानंतर प्रग्यानंदा म्हणाला. (Praggnanandhaa)

(हेही वाचा – Ind vs Afg 3rd T20 : बंगळुरूमध्ये भारतीय डावाच्या शेवटच्या षटकांत निघाल्या विक्रमी ३६ धावा )

प्रग्यानंदाने वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. आणि वयाच्या बाराव्या वर्षीच ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. आता सीनिअर गटातही प्रग्यानंदा अव्वल कामगिरी करत आहे. त्याची बहीण वैशालीही ग्रँडमास्टर आहे. आणि दोघं ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले बहीण-भाऊ आहेत. आज विश्वविजेत्याला नमवण्याची कामगिरी केल्यावर प्रग्यानंदवर कौतुकाचा वर्षाव होतोय. (Praggnanandhaa)

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत आता भारतीय ग्रँडमास्टर अनिश गिरी एकटा आघाडीवर आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात भारताच्याच डी गुकेशवर मात करून त्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या ४ सामन्यातींल ३ त्याने जिंकले आहेत. तर एक बरोबरीत सोडवला आहे. प्रग्यानंदा ३ बरोबरी आणि एका विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. (Praggnanandhaa)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.