Shooting Championship : प्रज्ना केसरकरने 11व्या पश्चिम क्षेत्र नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत जिंकली ३ सुवर्ण, तर १ रौप्य

261
Shooting Championship : प्रज्ना केसरकरने 11व्या पश्चिम क्षेत्र नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत जिंकली ३ सुवर्ण, तर १ रौप्य
Shooting Championship : प्रज्ना केसरकरने 11व्या पश्चिम क्षेत्र नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत जिंकली ३ सुवर्ण, तर १ रौप्य

स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लबची प्रज्ना केसरकर (वय 10 वर्षे) हिने पुणे येथील बालेवाडी येथे झालेल्या 11व्या पश्चिम क्षेत्र नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 4 पदके जिंकून सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत प्रज्ना केसरकर हिने महिला एअर पिस्तूल, ज्युनिअर महिला एअर पिस्तूल आणि युवा महिला एअर पिस्तूल या स्पर्धांत सुवर्णपदक, सब युथ वुमन एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. (Shooting Championship)

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचं छत्तीसगडवासीयांना मोठं गिफ्ट! ‘या’ प्रकल्पांना देणार भेट )

प्रज्ना केसरकर हिने वयाच्या ८व्या वर्षापासून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 2022 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर एअर राइफल क्लबमध्ये तिने मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. गेल्या 2 वर्षांपासून ती दररोज 2 तास सराव करते. प्रज्ना केसरकर ही दादर, पश्चिम येथील छबीलदास शाळेची विद्यार्थिनी आहे.

छबीलदास शाळेतील विद्यार्थी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतात. प्रत्येक शनिवारी सावरकर स्मारकात येऊन बॉक्सिंग, नेमबाजी, रायफल शूटिंग यांसारख्या साहसी क्रीडाप्रकारांचे ते प्रशिक्षण घेतात. छबीलदास शाळेच्या विद्यार्थ्यांना साहसी क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी विशेष पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे. (Shooting Championship)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.