Pramod Bhagat Suspended : पॅरा ॲथलीट प्रमोद भगतचं १८ महिन्यांसाठी निलंबन

Pramod Bhagat Suspended : उत्तेजकविरोधी पथकाला आपला ठावठिकाणा न कळवल्याबद्दल हा कारवाई झाली आहे

126
Pramod Bhagat Suspended : पॅरा ॲथलीट प्रमोद भगतचं १८ महिन्यांसाठी निलंबन
Pramod Bhagat Suspended : पॅरा ॲथलीट प्रमोद भगतचं १८ महिन्यांसाठी निलंबन
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार पॅरा ॲथलीट आणि टोकयोमध्ये सुवर्ण विजेता पॅरी बॅडमिंटनपटू प्रमोद भगतवर (Pramod Bhagat Suspended) १८ महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. उत्तेजकविरोधी पथकाला आपला ठावठिकाणा न कळवल्याबद्दल ही कारवाई त्याच्यावर झाली आहे. पण, त्यामुळे आगामी पॅरिस पॅरालिम्पिकला तो मुकणार आहे. त्याच्याकडून पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची अपेक्षा होती.

(हेही वाचा- Germany job opportunity : महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरीची संधी!)

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तेजक द्रव्य सेवनाशिवाय पार पडाव्यात यासाठी ऑलिम्पिक संघटनेनं मागची दोन दशकं मोहीम राबवली आहे. यात खेळाडूंची कधीही आणि कुठेही उत्तेजक द्रव्य चाचणी घेता यावी यासाठी खेळाडूंना ते जिथे कुठे राहत असतील आणि प्रवास करणार असतील, तिथला पत्ता त्या त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेला कळवणं बंधनकारक आहे. याला ठावठिकाणा नियम असं म्हटलं जातं. (Pramod Bhagat Suspended)

अगदी स्पर्धेच्या बाहेर असलात तरीही दरवेळी तुम्हाला तुमचा पत्ता सांगावा लागतो. तो सांगितला नाही तर आता भगतवर होतेय तशी कारवाई तुमच्यावर होऊ शकते. मार्च २०२४ मध्येच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने प्रमोद विरुद्ध बडगा उगारला होता. एका वर्षांत तीन वेळा त्याने या नियमाचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर प्रमोदने या निरीक्षणाविरोधात अपील केलं होतं. त्याची सुनावणी आता झाली आहे. मार्च २०२४ मध्ये संघटनेनं घेतलेली नोंदच ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे १ मार्चपासूनच त्याचं निलंबन सुरू झाल्याचं आता बॅडमिंटन फेडरेशनने स्पष्ट केलं आहे. (Pramod Bhagat Suspended)

(हेही वाचा- Kolkata Doctor Rape Murder प्रकरणी ममता सरकारला न्यायालयाचा दणका; तपास सीबीआयकडे)

१ सप्टेंबर २०२५ पर्यंत निलंबनाची मुदत असेल. ३६ वर्षीय प्रमोद भगत भारताचा सगळ्यात यशस्वी पॅराॲथलीट आहे. त्याने ऑलिम्पिक सुवर्णाबरोबरच पाचवेळा जागतिक अजिंक्यपद सुवर्णही पटकावलं आहे. (Pramod Bhagat Suspended)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.