येत्या रविवारी, १४ मे रोजी दहिसरमध्ये ‘प्रो बॉक्सिंग’चा थरार रंगणार आहे. डॉ. अशोक मुळगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहिसर बॉक्सिंग असोसिएशन आणि दहिसर स्पोर्ट फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह नवोदीत मुष्टीयोध्यांना (बॉक्सर) मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे. दहिसरमध्ये रंगणाऱ्या या ‘प्रो बॉक्सिंग स्पर्धे’त देशभरातील नामांकित बॉक्सरसह ग्रामीण भागांतील मुष्टीयोध्ये सहभागी होणार आहेत. इंडियन बॉक्सिंग असोसिएशनशी संलग्न असलेली ही ‘वर्ल्ड रॅंकिंग टुर्नामेंट’ आहे. ‘प्रो बॉक्सिंग स्पर्धे’त सहभागी होणाऱ्या बॉक्सरना रॅंक मिळतील. त्यामुळे त्यांची रॅंकिंग वाढून ते वर्ल्ड ऑर्गनायजेशनमध्ये जातील, अशी माहिती आयोजक सुबोध रावराणे यांनी दिली.
(हेही वाचा Pakistan : पाकिस्तानचा पाचवा पंतप्रधान निघाला भ्रष्टाचारी; इम्रान खानला अटक )
स्पर्धेचा उद्देश काय?
डॉ. अशोक मुळगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहिसर बॉक्सिंग असोसिएशन आणि दहिसर स्पोर्ट फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेतून चांगले, प्रोफेशनल बॉक्सर घडावेत, त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, असा उद्देश आहे. रविवारी, १४ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळत दहिसर स्पोर्ट फाऊंडेशन येथे ही स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community