Pro Hockey League : भारताची स्पेनवर ८-७ ने मात

पेनल्टी शूट आऊटवर अनुभवी श्रीजेशचा बचाव भारताला तारुन नेणारा ठरला. 

165
Pro Hockey League : भारताची स्पेनवर ८-७ ने मात
  • ऋजुता लुकतुके

खेळाच्या ९० मिनिटांत भारतीय संघाचा (Indian team) फारसा प्रभाव दिसला नाही. पण, तरीही पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताने स्पेनचा ८-७ असा पराभव केला. निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी झाल्यामुळे पेनल्टी शूट आऊटचा सहारा घ्यावा लागला होता. मध्यंतराला तर भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर होता. (Pro Hockey League)

प्रशिक्षक क्रेग फलटन निकालानंतरही नाराज होते. ‘आम्ही खूप साऱ्या तांत्रिक चुका केल्या. आणि चेंडूचा ताबा स्वत:कडे राखण्यात अपयशी ठरलो. चुकीमुळे मिळालेला ताबा आम्ही प्रतिस्पर्ध्यांना बहाल करत होते,’ परिणामी, मध्यंतराला भारतीय संघ पिछाडीवर होता. पण, मध्यंतराच्या ब्रेकमध्ये फलटन यांनी खेळाडूंना खडे बोल सुनावले असले पाहिजेत. कारण, त्यानंतर भारतीय संघ (Indian team) मैदानात उतरला तो आक्रमक खेळण्याच्या निर्धारानेच. (Pro Hockey League)

संघाने मध्यंतरानंतर २ मिनिटांत ३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. आणि हरमनप्रीत यातील पहिले दोन गोलमध्ये परिवर्तित करू शकला नाही, तरी तिसऱ्यावर अचूक गोल झाला. हरमनप्रीतच्या फटक्यावर पहिला प्रयत्न संजयने केला. पण तो प्रतिस्पर्धी गोलीने अडवला. अभिषेक डीमध्येच होता. त्याने परतवलेल्या चेंडूला पुन्हा गोलजाळ्याची दिशा दाखवली. आणि भारताने गोल पूर्ण केला. (Pro Hockey League)

(हेही वाचा – Anush Agarwalla : घोडेस्वारी प्रकारात अनुष अगरवाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र )

भारताचा पुढील मुकाबला नेदरलँड्सशी

बरोबरीनंतर भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण, त्याचं गोलमध्ये रुपांतर होऊ शकलं नाही. शेवटच्या १५ मिनिटांवर पुन्हा स्पेनचं वर्चस्व होतं. आणि त्यांनी ३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. श्रीजेश मात्र भारतीय संघ (Indian team) आणि गोल यांच्या मध्ये भक्कम उभा राहिला. ही पंधरा मिनिटं त्याने वाचवलीच. शिवाय पेनल्टी शूटआऊटमध्ये तोच तारणहार ठरला. (Pro Hockey League)

भारतासाठी अभिषेक कुमारने सरस खेळ केला. चौथ्या क्वार्टरमध्येही त्याने एक मैदानी गोल केला होता. पण, व्हिडिओ रेफरलमध्ये त्याने बॉलला दिशा देण्यापूर्वी बॉल त्याच्या बुटांवर लागल्याचं स्पष्ट झालं. आणि हा गोल पंचांनी नाकारला. या सामन्यातील विजयानंतर भारताचे आता ५ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. आणि आणि भारताचा पुढील मुकाबला बुधवारी नेदरलँड्सशी होणार आहे. (Pro Hockey League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.