- ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो हॉकी लीगच्या (Pro Hockey League) भारतातील टप्प्यात आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात आयर्लंडवर ४-० ने मात केली. पहिल्या तीन क्वार्टर्समध्येच भारतीय संघ ३-० ने आघाडीवर होता. आणि शेवटच्या काही सेकंदात जुगराजने गोल करत भारताला ४-० असा विजय मिळवून दिला. एकूण ८ सामन्यांमध्ये भारताचा हा तिसरा विजय होता. आणि गटात भारतीय संघाने तिसरं स्थान पटकावलं. प्रो लीगच्या गुणतालिकेत आता भारताचे १५ गुण झाले आहेत.
भारतीय संघाला एकदा ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. तर तीन सामन्यांमध्ये बरोबरीत समाधान मानावं लागलं.
रविवारच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आयरिश संघ तुलनेनं नवखा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवलं. सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला निलकांता शर्माने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. आणि त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला आकाशदीपने ही आघाडी २-० अशी वाढवली. मध्यंतराला भारताकडे व्यवस्थित आघाडी आणि चेंडूवर ताबाही होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi : ‘विकसित भारत’ च्या गॅरंटीसह पंतप्रधानांनी केले २ हजारहून अधिक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन)
Glory on the last frontier!
India conquers Ireland 4-0 in a dazzling final day of the FIH Pro League 2023/24 India leg, showcasing skill, spirit, and supremacy
India 🇮🇳 4 – Ireland 🇮🇪 0
Goal Scorers:
14′ Sharma Nilakanta (PC)
15′ Singh Akashdeep
38′ Singh Gurjant
60′ Singh… pic.twitter.com/P2oMwShfjq— Hockey India (@TheHockeyIndia) February 25, 2024
त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये खेळ काहीसा संथ झाला असताना त्यात जान फुंकली ती मनप्रीत सिंगने रचलेल्या चालीने. चेंडू गोल जाळ्याजवल आल्यावर डाव्या बगलेतून मनप्रीतने अप्रतिम पास गुरजंत सिंगकडे दिला. आणि गुरजंतने अगदी काही इंचांच्या अचूकतेनं चेंडूला गोल जाळ्याची दिशा दाखवली. मनप्रीतचा हा पास स्पर्धेतील सर्वोत्तम पासेस पैकी एक असावा. डी क्षेत्राच्या बाहेर चेंडूचा ताबा मिळवलेल्या मनप्रीतने तो खेळवत आत खोलवर आणला. आणि योग्य वेळेला गुरजंत सिंगला दिला. (Pro Hockey League)
भारताचा चौथ गोल शेवटच्या काही मिनिटांत जुगराज सिंगने केला. भारतीय संघाचा विजय झाला असला तरी पेनल्टी कॉर्नरवरील अपयश आणखी एकदा दिसलं. हरमनप्रीतला चार पेनल्टी कॉर्नरपैकी एकावरही गोल करता आला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community