Teachers recruitment scam : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक

146

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीत त्या दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना काही वेळापूर्वी अटक केली आहे. याना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टी ई टी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. शैलजा दराडे यांनी हे पैसै त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याच तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी सांगितले. मात्र पैसै देऊन देखील नोकरी न मिळवल्याने पोपट सुर्यवंशी यांनी पेसै परत मागीतले असता शैलजा दराडे यांनी पैसै परत केले नाहीत. त्यामुळे पोपट सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणातील तक्रारदार पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यात मोबाईलवरून 2019 मधे झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आल होती. ज्यामधे शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आर टी ओ मधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण ती लाऊन देऊ शकतो असं सांगतायत. त्यासाठी पन्नास लाख रुपये मोजावे लागतील असं त्या या ऑडिओ क्लीप मधे म्हणतायत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलीसांनी शैलजा दराडेंना अटक केली.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.