कै. बलभिमआण्णा जगताप क्रीडा नगरी अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत पुण्याच्या पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा महेंद्र गायकवाड याच्यावर २ गुणांनी मात करत महाराष्ट्र केसरीचा ठरला.
अटितटीच्या झालेल्या या लढतीत उंचपुर्या आणि धिप्पाड शरीरयष्टी लाभलेल्या महेंद्र गायकवाडला पृथ्वीराजने चांगलीच टक्कर दिली. पहिल्या राऊंडमध्ये दोघांनी एक – एक गुण घेतला होता. दुसऱ्या राऊंडमध्ये मोहोळ आणि गायकवाड यांची तुल्यबळ लढत झाली. अगदी शेवटच्या मिनिटाला पृथ्वीराजने एक गुण मिळवला. पण पंचाचा हा निर्णय महेंद्र गायकवाडला मान्य झाला नाही त्याने कुस्ती अर्धवट सोडली. त्यानंतर पंचानी दोन गुण मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. दरम्यान गादी गटातून डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती यामध्ये पृथ्वीराजने राक्षे याच्यावर मात केली.
(हेही वाचा राज्यातील Contractor यांचे ८९ हजार कोटी सरकारने थकवले; ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन)
या कुस्तीला वादाचे गालबोट लागले. राक्षे याने हा निकाल अमान्य केला. माती गटातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड, परभणीचा साकेत यादव यांच्यात लढत झाली यामध्ये महेंद्र गायकवाडने साकेत यादव याचा पराभव केला. अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात रंगली. (Maharashtra Kesari)
Join Our WhatsApp Community