-
ऋजुता लुकतुके
आर्टिक्ट ओपन पाठोपाठ डेन्मार्क ओपनमध्येही पी व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनने तिचा तीन गेममध्ये २१-१८.१९-२१ आणि २१-७ असा पराभव केला. पहिले दोन्ही गेम अत्यंत चुरशीचे झाले. पण, तिसऱ्या गेममध्ये अचानक सिंधूची लय बिघडली आणि तिने सुरुवातीपासूनच कॅरोलिनाला वर्चस्वाची संधी दिली. खरंतर उपांत्य फेरीत पोहोचेपर्यंत सिंधूचा स्पर्धेतील खेळ चांगला झाला होता आणि गेल्या हंगामापासून घसरलेला तिचा फॉर्म आता सावरतोय, असंही वाटत होतं. पण, आधी आर्टिक्ट ओपन आणि आता डेन्मार्कमध्येही विजेतेपदांनी तिला हुलकावणीच दिली आहे. (P V Sindhu Loses)
Not the end we would’ve wanted but a fabulous week in 🇩🇰 for Sindhu. Onwards and Upwards from here 🙌
📸: @badmintonphoto #DenmarkOpen2023#Badminton pic.twitter.com/sCunIEMM5x
— BAI Media (@BAI_Media) October 21, 2023
या पूर्ण हंगामात सिंधूला एकही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. जागतिक क्रमवारीतही तिची तेराव्या स्थानापर्यंत पिछेहाट झाली आहे. कॅरोलिना मरिन बरोबरच्या उपांत्य सामन्यात सिंधूने सुरुवातीला चांगला खेळ केला. पहिल्या गेममध्ये दोघी १८व्या गुणापर्यंत तुल्यबळ होत्या. पण, मोक्याच्या क्षणी कॅरोलिनाने आक्रमक बाणा दाखवत महत्त्वाचे गुण मिळवले. (P V Sindhu Loses)
(हेही वाचा – Nanded News : नांदेड मधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आजारी, जनआरोग्याच्या अभ्यासात अनेक त्रुटी समोर)
तर दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे असलेली ११-३ची आघाडी ती पूर्णपणे टिकवू शकली नाही. सलग आठ गुण मिळवत कॅरोलिनाने बरोबरीही मिळवली होती. पण, सिंधूने इथं पुन्हा एकदा मुसंडी मारत दुसरा गेम आपल्या नावावर केला. सिंधूचा बचाव आणि नेटजवळचा खेळ यामुळे ती दुसरा गेम जिंकू शकली. (P V Sindhu Loses)
सामना अगदी तुल्यबळ सुरू असताना अचानक तिसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमकताच सोडून दिली. तिने कॅरोलिनाला वर्चस्वाची संधी दिली आणि कॅरोलिनाने ती अलगद उचलली. सिंधूने फक्त तीन गुण घेतले असताना कॅरोलिनाने ११ गुणांची आघाडी घेतलेली होती आणि पुढेही आघाडी टिकवत फारसा प्रतिकार न करणाऱ्या सिंधूनला तिने आरामात हरवलं. कॅरोलिनाचे स्मॅशचे फटके जोरकस असतात आणि या फटक्यांना तिसऱ्या गेममध्ये तरी सिंधूकडे उत्तर नव्हतं. रिओ ऑलिम्पिक नंतर महत्त्वाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत दोघी पहिल्यांदाच आमने सामने आल्या होत्या आणि ही लढत कॅरोलिनाने जिंकली. (P V Sindhu Loses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community