PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधू अडकणार विवाह बंधनात, हैद्राबाद टेकीशी २२ डिसेंबरला विवाह

सिंधूचा होणारा नवरा आहे वेंकटा दत्ता साई

96
PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधू अडकणार विवाह बंधनात, हैद्राबाद टेकीशी २२ डिसेंबरला विवाह
PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधू अडकणार विवाह बंधनात, हैद्राबाद टेकीशी २२ डिसेंबरला विवाह
  • ऋजुता लुकतुके

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पी व्ही सिंधू (PV Sindhu) आपल्या खाजगी आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. नुकतीच तिने लखनौ इथं सय्यद मोदी चषक स्पर्धा जिंकली आहे. आणि त्यानंतर लगेच तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाची गोड बातमी दिली आहे. येत्या २२ तारखेला हैद्राबादमधील एक टेकी वेंकट दत्ता साई (Venkat Dutta Sai) हा सिंधूचा वाङदत्त वर आहे. पोसिडेक्स टेक्नॉलॉजिज् इतं तो कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो. ‘दोन्ही कुटुंबं एकमेकांना ओळखत होती. पण, लग्नाचा प्रस्ताव गेल्या महिन्यातच आला. जानेवारीपासून सिंधू आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात व्यस्त होईल. त्यामुळे डिसेंबरची वेळ ठरली,’ असं सिंधूचे वडील वेंकट रमणा यांनी सांगितलं.

(हेही वाचा – बांगलादेशात इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या वकीलावर हल्ला; प्रकृती चिंताजनक असल्याची राधारमण दास यांची माहिती)

२२ डिसेंबरला उदयपूर इथं विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आणि २४ डिसेंबरला हैद्राबाद इथं स्वागत समारंभ आयोजित केला जाईल. त्यानंतर लगेचच सिंधूला सरावाला सुरुवात करायची आहे, असं रमणा पीटीआयशी बोलताना म्हणाले. उदयपूरमधील समारंभही ३ दिवसांचा पारंपरिक लग्न सोहळा असणार आहे. (PV Sindhu Wedding)

सिंधू ही भारतातील सेलिब्रिटी खेळाडू आहे. ५ विश्वविजेतेपद स्पर्धेतील पदकं, रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य आणि टोकयोमधील कांस्य २०१९ मधील विश्वविजेतेपद अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाची पदकं २९ वर्षीय बॅडमिंटनपटूने जिंकली आहेत. २०१७ मध्ये सिंधू जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती. ही तिची अव्वल कामगिरी आहे. कारकीर्दीच्या या टप्प्यावर ती नवीन अध्यायासाठी तयार होत आहे. (PV Sindhu Wedding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.