CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत पी.व्ही. सिंधूची सुवर्ण कामगिरी

130

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पी.व्ही.सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे.

( हेही वाचा : कोकणातील करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळली; वाहतूक ठप्प)

पी.व्ही. सिंधूला सुवर्ण

पी.व्ही.सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. सिंधूच्या सुवर्णाने कॉमनवेल्थ स्पर्धेत( CWG ) आता भारताकडील एकूण पदकांची संख्या 56 झाली असून, यामध्ये 19 सुवर्ण पदके, 15 रौप्य पदके आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. या विजयासोबतच भारत न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताचे पदक विजेते खेळाडू

सुवर्णपदक- 19

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू.

रौप्यपदक- 15

संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.

कांस्यपदक- 22

गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.