राजकोट येथे भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 3rd Test) यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन (R Ashwin) कमबॅक करत आहे. भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन काही वैयक्तिक कारणांमुळे थोड्या काळासाठी संघाच्या बाहेर होता. मात्र आता तो चौथ्या दिवसाच्या खेळासाठी सज्ज झाल्याची अधिकृत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बी. सी. सी. आय.) दिली आहे.
(हेही वाचा – Aaditya Thackeray : “तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जा”; आदित्य ठाकरेंचा राहुल गांधींना अजब सल्ला)
भारतीय संघाकडून खेळण्यासाठी अश्विन सज्ज –
आर. अश्विन (R Ashwin) आणि संघ व्यवस्थापन या दोघांनीही अश्विनच्या पुनरागमनासाठी आपली तयारी दर्शवली असून सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आहे. खेळाचा एक दिवस चुकला असला तरी, अश्विन संघासाठी त्याचे समर्पण आणि वचनबद्धता अधोरेखित करत, आवश्यक तितक्या लवकर चेंडूने योगदान देण्यास तयार असेल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.
भारतीय संघ अश्विनच्या पाठीशी उभा –
बीसीसीआयने सांगितले की; टीम मॅनेजमेंट, खेळाडू, मीडिया आणि चाहत्यांनी अश्विनच्या कुटुंबाचं महत्त्व प्राधान्याने स्वीकारून खूप समज आणि सहानुभूती दाखवली. तसेच भारतीय संघ नेहमी अश्विनच्या (R Ashwin) पाठीशी आहेत आणि त्याचे समर्थक देखील एकजूट राहिले आहेत.
(हेही वाचा – Eknath Shinde: मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंना फुटला घाम, शिवसेनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचा दावा)
अश्विनने (R Ashwin) राजकोट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आपल्या ५०० टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतरच त्याला कौटुंबिक कारणामुळे घरी जावं लागलं. मात्र आता पुन्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकीची जादू अनुभवायला मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community