- ऋजुता लुकतुके
बुद्धिबळातील भारताचा उगवता तारा आर प्रग्यानंदाने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. जागतिक बुद्धिबळ टूअरचा भाग असलेल्या सुपरबेट स्पर्धेत ब्लिट्झ प्रकारात प्रग्यानंदाने हा विजय मिळवला. या विजयानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर चीनचा वाय यी ३०.५ गुणांसह अव्वल आहे. स्पर्धेच्या अजून ९ फेऱ्या बाकी आहेत. प्रग्यानंदने कार्लसन विरुद्ध विजय मिळवला असला तरी एकूण स्पर्धेत त्याच्या खात्यात १४.५ गुण जमा आहेत. म्हणजेच वाय यीपेक्षा तो साडेपाच गुणांनी पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडेही १८.५ गुण आहेत. तो दोन गुणांनी पिछाडीवर आहे. (R Praggnanandhaa)
भारताचे अर्जुन एरिगसी आणि अनिष गिरी हे इतर दोन बुद्धिबळपटूही या स्पर्धेत उतरले आहेत. (R Praggnanandhaa)
Day 4 of the 2024 Superbet Poland Rapid & Blitz saw the first day of blitz action, as the incoming leader 🇨🇳 Wei Yi continued his dominance in the event, scoring 7.5/9 to extend his lead over Magnus Carlsen and the rest of the field. Wei Yi sits at the top with 20.5 points,… pic.twitter.com/yo1sO4YmS0
— International Chess Federation (@FIDE_chess) May 12, 2024
(हेही वाचा – Rain in Mumbai : मुंबईत पावसाचा पॉवर प्ले; विमानतळाचा रन-वे बंद, मेट्रो ठप्प)
अर्जुन एरिगसी १४ गुणांसह प्रग्यानंदच्या पाठोपाठ चौथ्या स्थानावर आहे. किरगिझस्तानचा डुडा यान पाचव्या स्थानावर आहे. अलीकडेच कँडिडेट्स चषक जिंकलेला डी गुकेश ब्लिट्झ प्रकारात थोडा चाचपडताना दिसतोय. आणि ९.५ गुणांसह तो सध्या तळाला आहे. कार्लसनला सलग दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. प्रग्यानंदापूर्वी अब्दुसातोरोव्हनेही त्याचा पराभव केला होता. त्यामुळे हा सामना गमावल्यावर तो स्वत:वरच नाराज होता. ‘माझ्याकडून नको त्या चुका होत आहेत. जिंकू शकेन असा पट मी हरतो आहे. त्यामुळे मी सध्या हताश आहे.’ असं कार्ससन सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (R Praggnanandhaa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community