- ऋजुता लुकतुके
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनबरोबरचा दुसरा सामनाही अनिर्णित राखला आहे. त्यामुळे स्पर्धेचा विजेता गुरुवारी टायब्रेकवर ठरेल. मानाच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीतला अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनबरोबरचा दुसरा सामना अनिर्णित राखला आहे. त्यामुळे अंतिम फेरीची लढत टायब्रेकरवर गेली आहे. आणि विजेता गुरुवारी ठरेल.
दुसऱ्या सामन्यात कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळत होता. पण, सुरुवातीलाच प्रज्ञानंदने कार्लसनचं एक प्यादं मारून सामन्यात चांगली सुरुवात केली होती. दोघांचा खेळ वेगवान होता. पण, त्या नादात प्रज्ञानंदचं वेळेचं गणित बिघडत गेलं. आणि कार्लसननेही ३० व्या चालीतच प्रज्ञानंदला बरोबरीचा प्रस्ताव दिला.
Magnus Carlsen takes a quiet draw with white against Praggnanandhaa and sends the final to tiebreaks. The winner of the #FIDEWorldCup will be decided tomorrow!
📷 Maria Emelianova pic.twitter.com/aJw1vvoFnK
— International Chess Federation (@FIDE_chess) August 23, 2023
(हेही वाचा – Home minister : तत्कालीन गृहमंत्री यांचे सचिव असल्याचे सांगून सुरतच्या इंजिनियरची फसवणूक)
टायब्रेकरचा सामना गुरुवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळत होता. पण, १८ वर्षीय प्रज्ञानंदने त्याला चांगली लढत दिली. आणि २० व्या चालीपर्यंत दोघांनी आपापले हत्ती गमावले होते. तिथेच साधारणपणे खेळाचं चित्र स्पष्ट झालं. जागतिक क्रमवारीत प्रज्ञानंद २३ व्या स्थानावर आहे. तर कार्लसन अव्वल क्रमांकावर. या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करतानाच प्रज्ञानंदने कँडिडेट्स कपमध्येही थेट प्रवेश मिळवला आहे. कँडिडेट्स स्पर्धेतून विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यात येतो.
अंतिम फेरी सुरू झाली तेव्हाच मॅग्नस कार्लसने पोटात विषबाधा झाल्याचं सांगितलं होतं. आणि खेळताना तो १०० टक्के तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे दोन्ही सामन्यांत त्याने सुरुवातीपासून बरोबरीचंच धोरण ठेवल्याचं दिसलं. ३० चालींमध्ये त्याने बरोबरीचा प्रस्तावही ठेवला. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदची या स्पर्धेतील वाटचाल स्वप्नवत वाटावी अशीच आहे. अंतिम फेरीत पोहोचताना त्याने जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकीत हिकारू नाकामुरा आणि तृतीय मानांकीत फॅबियानो करुआना यांना हरवलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community