- ऋजुता लुकतुके
‘आपण स्पर्धेत आव्हान उभं करण्याइतके तंदुरुस्त असू तरच फ्रेंच ओपनमध्ये सगभागी होऊ,’ असं विक्रमी १४ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या राफेल नदालने बुधवारी स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही, तर ही स्पर्धा आज झाली तर आपण खेळू शकत नाही, हे ही त्याने स्पष्ट केलं. पण, उरलेले काही दिवस आपल्यातील ऊर्जा वाचवून तो फ्रेंच ओपन खेळण्याचा निकराचा प्रयत्न करणार आहे. (RaFael Nadal)
(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईत महिलांना प्रतिनिधित्व नाही )
‘पुढच्या ३ आठवड्यात काय होईल हे मला सांगता येणार नाही. मी प्रयत्न करत राहणार आहे. आणि माझ्याकडून जे शक्य आहे, ते मी करणार आहे. मी खेळू शकलो तर खेळेन, नाहीतर खेळणार नाही,’ असं नदाल माद्रिद (Nadal Madrid) ओपन स्पर्धेपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. पॅरिसमध्ये (Paris) आव्हान उभं करू शकलो, तरंच खेळण्यात मजा आहे, असं या माजी विश्वविजेत्या टेनिसपटूला वाटतं. क्ले कोर्टचा हंगाम गेल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. नदाल बार्सिलोना ओपनमध्ये खेळला होता. पण, तिथे दुसऱ्या फेरीत त्याचा पराभव झाला. (RaFael Nadal)
त्यानंतर आपली तब्येत आणि तंदुरुस्ती याचा फेरआढावा नदालने घेतला आहे. यावर्षी ब्रिस्बेन ओपन स्पर्धेत (Brisbane Open) नदालने टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं. पण, तिथेही दुसऱ्या फेरीतच त्याला दुखापतीमुळे गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धा खेळू शकला नाही. आणि दोन महिने तो पुन्हा टेनिसपासून दूर होता. आता आपली लाडकी क्ले कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याला खेळायची आहे. पण, ३७ वर्षीय माजी चॅम्पियनला तंदुरुस्तीची भीती वाटतेय. (RaFael Nadal)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ‘ही’ माझी शेवटची निवडणूक, नारायण राणे राजकीय निवृत्तीची घोषणा करत म्हणाले…)
पण, त्याचवेळी तो आशावादीही आहे. ‘चार आठवड्यांपूर्वी व्यावसायिक टेनिस मी पुन्हा खेळू शकेन की नाही, हेच मला माहीत नव्हतं. पण, आता मी खेळतोय. त्यामुळे पुढे काय होईल, हे मला सांगता येणार नाही. मी जे करणं अपेक्षित आहे, तेच मी करणार आहे. तंदुरुस्तीवर मेहनत घेणार आहे. बाकी येणारा काळच सांगेल.’ असं त्याने शेवटी निक्षून सांगितलं. नदालच्या नावावर १४ फ्रेंच ओपन विजेतेपदांबरोबरच एकूण २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. (RaFael Nadal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community