- ऋजुता लुकतुके
नदाल (Rafael Nadal) जानेवारीपासून वर्षभर स्पर्धात्मक टेनिस खेळलेला नाही. पण, पुनरागमनासाठी तयार असल्याचं तो म्हणतोय. (Rafael Nadal on Comeback)
माजी अव्वल टेनिसपटू आणि २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं नावावर असलेला स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) ३७ वर्षांचा झाला तरी व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. खरंतर जानेवारी २०२३ पासून हिप इंज्युरीमुळे तो टेनिसपासून दूर आहे. (Rafael Nadal on Comeback)
पण, आता तो दुखापतीतून सावरलाय आणि पुढील हंगामात तो एटीपी सर्किटवर पुनरागमनही करणार आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक मुलाखत प्रसारित झाली आहे आणि यात नदालने (Rafael Nadal) आपल्या भावी योजना स्पष्ट केल्या आहेत. ‘मला वाटतं मी तयार आहे आणि मला विश्वासही आहे आणि आशाही आहे की, अजून व्यावसायिक टेनिस मी खेळू शकेन,’ असं नदालने (Rafael Nadal) या मुलाखतीत म्हटलं आहे. (Rafael Nadal on Comeback)
(हेही वाचा – P V Sindhu : तू कुणाला डेट केलं आहेस का, या प्रश्नावर सिंधूने दिलं ‘हे’ उत्तर)
एटीपीचा नवीन हंगाम २९ डिसेंबरला ब्रिस्बेनमधील युनायटेड कपने सुरू होतोय आणि हीच नदालची पुनरागमनाची स्पर्धा असेल. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा खेळायची आहे. जवळ जवळ वर्षभर स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असल्यामुळे नदाल (Rafael Nadal) क्रमवारीत ६६३ स्थानापर्यंत खाली घसरला आहे. (Rafael Nadal on Comeback)
पण, पुनरागमनासाठी तो उत्सुक आहे.
De mi anuncio del viernes… algunas explicaciones esta semana. Aquí la primera:
👉🏻 Tengo y he tenido miedo de anunciar las cosas. Me ha causado miedo querer anunciar algo sin estar seguro al 100%…
👉🏻 Creo que estoy preparado y confío y espero que las cosas vayan bien y que me… pic.twitter.com/vHnDSQzBCx— Rafa Nadal (@RafaelNadal) December 4, 2023
नदाल खेळत नव्हता त्या काळात प्रतिस्पर्धी नोवाक जोकोविचने नदालला (Rafael Nadal) ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. जोकोविचकडे आता २४ विजेतेपदं आहेत. पण, नदालला आता स्वत:क़डून फारशा अपेक्षा ठेवायच्या नाहीएत. त्याला आपला खेळ आजमावायचा आहे आणि त्याची लाडकी फ्रेंच ओपन स्पर्धा ताकदीनिशी खेळायची आहे. यापूर्वी विक्रमी १४ वेळा त्याने ती जिंकलीय. (Rafael Nadal on Comeback)
‘यापूर्वी मी कायम स्वत:कडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी झटलो. पण, आता स्वत:कडून कसलीही मागणी करायची नाही एवढं सामर्थ्य माझ्यात आलंय. तेच मी करणार आहे,’ असं नदाल (Rafael Nadal) या मुलाखतीत म्हणाला आहे. (Rafael Nadal on Comeback)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : अधिवेशन काळातही याचिकेवर सुनावणी घेणार – राहुल नार्वेकर)
याशिवाय पुनरागमन केलं तरी समोर आव्हानं मोठी असतील याची त्याला कल्पना आहे. (Rafael Nadal on Comeback)
नदाल (Rafael Nadal) सध्या ३७ वर्षांचा असून. पुनरागमनानंतरचं व्यावसायिक टेनिसमधील त्याचं शेवटचं वर्षं असेल असं बोललं जात आहे. (Rafael Nadal on Comeback)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community