- ऋजुता लुकतुके
२००७ ची फ्रेंच ओपन स्पर्धा नदालने रॉजर फेडररचा ६-३, ४-६, ६-३ व ६-४ असा पराभव केला होता. या सामन्यात चॅम्पियनशिप गुण असताना नदालने वापरलेल्या रॅकेटवर एका लिलावात १.११ लाख अमेरिकन डॉलरची बोली लागली आहे. टेनिसमध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत लागलेल्या सर्वाधिक बोलींपैकी ही एक बोली आहे. या विजेतेपदानंतर नदालने आपल्या खात्यात आणखी १९ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची भर घातली. आणि यातील १४ फ्रेंच ओपन विजेतेपदंच होती.
नदालने ही रॅकेट २००७ च्या त्या स्पर्धेत महत्त्वाच्या सगळ्या सामन्यांमध्ये वापरली होती. अगदी उपान्त्य फेरीत नोवाक जोकोविचला हरवतानाही त्याने हीच रॅकेट वापरली होती. आतापर्यंत ही रॅकेट ऑस्ट्रेलियातील एका टेनिस वस्तू संग्रहालयात होती. आता त्यांनीच या रॅकेटचा लिलाव केला आहे.
$118,206: Price paid tonight at @PrestigeMem for Rafael Nadal’s 2007 French Open Final winning racket.
It’s the third most valuable tennis racket of all time behind Rafael Nadal’s 2022 Australian Open racket ($139K) & Billie Jean King’s “Battle of the Sexes” racket ($125K). pic.twitter.com/66YmPwQ1dQ
— Darren Rovell (@darrenrovell) January 29, 2024
(हेही वाचा – LIC Stake in HDFC : एलआयसीची वाढीव गुंतवणूक एचडीएफसी बँकेसाठी किती लाभदायक?)
टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी नदाल करतोय तयारी
टेनिसमध्ये लिलावात एक लाख अमेरिकन डॉलरच्या वर किंमत मिळवणारी ही तिसरी रॅकेट आहे. यापूर्वी नदालच्याच २०२२ साली वापरलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील रॅकेटला १,३९,७०० लाख अमेरिकन डॉलर इतकी किंमत मिळाली होती. तर बिली जॉन किंग यांनी पुरुष खेळाडूला आव्हान देऊन खेळलेला सामना ज्याची ‘बॅटल ऑफ सक्सेस’ अशी ओळख आहे, त्या सामन्यात वापरलेली रॅकेट १,२५,००० अमेरिकन डॉलरला विकली गेली होती.
नदालची लोकप्रियता फ्रान्स पाठोपाठ ऑस्ट्रेलियात सर्वाधिक आहे. आणि त्याच्या जोरावर नदालच्या रॅकेटना इथं किंमत मिळाली आहे. पण, खुद्द नदाल दुखापतीमुळे मागची दोन वर्ष ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पूर्णपणे खेळू शकलेला नाही. सध्या मांडीचा स्नायू दुखावलेला नदाल ३७ व्या वर्षी टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी तयारी करत आहे. पुढील महिन्यात कतारमधील दोहा ओपन स्पर्धा तो खेळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community