Rafael Nadal : ब्रिस्बेनमधील पराभवानंतर राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनबद्दल अनिश्चित

ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत उपउपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन खेळाडूने नदालला पराभवाचा धक्का दिला आहे. 

182
Rafael Nadal : नॉर्डिया चषकाच्या अंतिम फेरीत राफेल नदालचा पराभव
  • ऋजुता लुकतुके

२२ ग्रँडस्लॅम विजेता स्पॅनिस टेनिसपटू राफेल नदालला (Rafael Nadal) ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत उपउपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन जॉर्डन थॉमसनकडून पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर नदाल मानसिक दृष्ट्या थोडा निराश झालेला दिसतोय. मैदानावर झालेल्या पराभवामुळे नाही, तर सामन्यादरम्यान नदालला (Rafael Nadal) एकदा वैद्यकीय उपचारासाठी ब्रेक घ्यावा लागला. आणि त्यामुळे नदालला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळता येईल का याविषयी शंका वाटतेय. (Rafael Nadal)

३७ वर्षीय नदालने ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी म्हणूनच ब्रिस्बेन इंटरनॅशनलची (Brisbane International) निवड केली होती. जून २०२३ मध्ये शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर नदाल स्पर्धात्मक टेनिसपासून दूर होता. पण, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. आणि पुढील आठवड्यात सराव करता येईल की नाही याची खात्री नदालला वाटत नाहीए. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली यात्रा; शेकडो राष्ट्रभक्तांचा सहभाग)

नदालने यापूर्वी २००९ आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली

‘मला पुढच्या आठवड्यात सराव करता आला आणि पुढे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळता आली तर मला खूप बरं वाटेल. पण, आता मला तशी शंभर टक्के खात्री नाही,’ असं नदाल मीडियाशी बोलताना म्हणाला. (Rafael Nadal)

ब्रिस्बेन ओपनमध्ये नदालचा थॉमसनकडून ५-७, ७-६ आणि ६-३ असा पराभव झाला. पहिला सेट नदालने आरामात जिंकला होता. पण, दुसऱ्या सेटपासून नदालला पायाचा त्रास सुरू झाला. आणि तिसऱ्या सेटमध्ये तर त्याला २ मिनिटांचा वैद्यकीय ब्रेक घ्यावा लागला. (Rafael Nadal)

नदालने यापूर्वी २००९ आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. आणि यावर्षी स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.