- ऋजुता लुकतुके
राफेल नदाल मागच्या चार वर्षांत तीनदा अमेरिकन ओपन दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. पण, यंदा तो निकराचा प्रयत्न करणार आहे. सध्या संरक्षित क्रमवारीचा आधार घेऊन त्याने अमेरिकन ओपनमध्ये प्रवेशही मिळवला आहे. मंगळवारी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला तेव्हा नदालचं नाव बघून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार. (Rafael Nadal)
२६ ऑगस्टला ही स्पर्धा सुरू होत आहे आणि नदालकडे ९ ही संरक्षित क्रमवारी आहे. तुम्ही दुखापतीमुळे ३ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी खेळू शकणार नसाल तर तुमची तेव्हाची क्रमवारी तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. याच नियमाचा फायदा नदालने घेतला आहे. (Rafael Nadal)
फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत नदालला अलेक्झांडर झ्वेरेवकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तो तो नॉर्डिया ओपन स्पर्धेत मंगळवारी पहिल्यांदा एकेरी खेळला. पहिला सामना तो जिंकलाही आहे. लिओ बोर्गचा त्याने ३-६ आणि ४-६ असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकची तयारी म्हणून तो नॉर्डिया ओपन स्पर्धेकडे बघत आहे. (Rafael Nadal)
Back at the office for Rafa! pic.twitter.com/heiLhG9lK6
— US Open Tennis (@usopen) July 16, 2024
(हेही वाचा – vaghankhe: शिवरायांची वाघनखे मुंबईत दाखल! साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भव्य सोहळा होणार)
२०१९ मध्ये नदालने चौथं अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर फक्त २०२२ मध्ये तो इथं खेळला आहे. यावर्षीही ३८ वर्षीय नदाल अनेक दुखापतींशी झगडला आहे. पाय आणि हिपच्या दुखापतीमुळे तो नियमितपणे खेळू शकला नसला तरी खेळण्याच्या अवीट इच्छेमुळे तो यंदा निकराचा प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी करत असताना ब्रिस्बेन इथं त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो खेळू शकला नाही. फ्रान्समध्येही पहिल्या फेरीत त्याला गाशा गुंडाळावा लागला. (Rafael Nadal)
आता पुन्हा एकदा नदाल काही स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्रेंच ओपनमधील पराभवानंतर आता तो पॅरिस ऑलिम्पिक आणि अमेरिकन ओपनवर लक्ष केंद्रीत करणार आहे. २२ ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालचं हे कदाचित शेवटचं वर्ष असेल. त्यानंतर तो व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार आहे. (Rafael Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community