महाराष्ट्राच्या राही सरनोबत या कन्येने सलग तिस-यांदा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. त्यामध्ये 64 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिस-यांदा सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
राहीची दमदार कामगिरी
नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतने 37 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. राहीने आपले जेतेपद कायम राखताना दमदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना मागे टाकले. या स्पर्धेत दिल्लीच्या 14 वर्षीय नाम्या कपूरने 31 गुणांसह रौप्यपदक मिळवले.
अशी आहे इतर स्पर्धकांची कामगिरी
राहीने नुकतीच कनिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत, ओडिशाच्या श्रीयांका सदांगीने महिलांच्या 50 मीटर थ्री-पोझिशन प्रकाराचे अजिंक्यपद मिळवले. मध्य प्रदेशच्या मानसी कथित आणि बंगालच्या आयुषी पोद्दारने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. ज्युनियर महिलांच्या थ्री पोझिशनमध्ये, हरियाणाच्या निश्चलने 452.9 च्या नवीन विक्रमासह सुवर्ण जिंकले. मध्य प्रदेशची आशी चौकसे ४५०.९ गुणांसह दुसऱ्या तर पंजाबच्या सिफ्ट कौर साम्राने ४४०.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
( हेही वाचा भारतीय लष्कर ध्वज दिन, जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व )
Join Our WhatsApp Community