Rahul Dravid : ‘मी पुढील आठवड्यापासून बेरोजगार आहे,’ – राहुल द्रविड

Rahul Dravid : खेळाडू म्हणून राहुल द्वविड यांना जे मिळालं नाही ते प्रशिक्षक म्हणून मिळालं.

189
Rahul Dravid : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?
  • ऋजुता लुकतुके 

१७ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार म्हणून राहुल द्रविड सपशेल अपयशी ठरले होते. भारतीय संघ बांगलादेशकडून हरला आणि गटवार साखळीतच संघाचा निकाल लागला. ही कटू आठवण मागे टाकताना द्रविडला किती कष्ट पडले असतील याची कल्पनाच केलेली बरी. पण, २०२४ चा जून महिना त्यांच्यासाठी वेस्ट इंडिजमध्येच एक चांगली स्मृती देऊन गेला आहे. भारतीय संघाने टी-२० विजेतेपद पटकावलं आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाबरोबरच्या कारकीर्दीला यशाची झळाळी मिळाली. (Rahul Dravid)

अंतिम सामना संपल्यानंतर राहुल यांनी पत्रकारांना एक मोठं हास्य करत एक गोष्ट सांगितली, ‘मी आता बेरोजगार आहे. माझ्यासाठी काही ऑफर आहेत का तुमच्याकडे?’ अर्थात द्रविड गंमत करत होते. क्रिकेटपासून त्यांना काही काळ दूरच राहायचं आहे. (Rahul Dravid)

शिवाय खेळाडू म्हणून जे गमावलं ते प्रशिक्षक म्हणून कमावलं हे विधानही त्यांना फारसं पटत नाही. ‘हे विजेतेपद माझ्यासाठी आयुष्यभराची गोड आठवण आहे. पण, याला मी कर्जाचं ओझं उतरलं असं मानत नाही. खेळाडू म्हणून मी नेहमीच १०० टक्के प्रयत्न केले होते. मी चषक जिंकू शकलो नाही हा दैवाचा निर्णय होता. मला असे अनेक चॅम्पियन खेळाडू माहीत आहेत, जे मैदानावर यशस्वी ठरले पण, त्यांना मोठा चषक उंचवता आला नाही. मला त्याचं वाईट वाटत नाही. मी आताच्या क्षणाला महत्त्व देतो,’ असं द्रविड म्हणाले. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Dinesh Karthik : दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवीन फलंदाजीचा प्रशिक्षक आणि सल्लागार)

भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक अशा अनेक यशस्वी जोडया आहेत. सौरव गांगुली-जॉन राईट, धोनी-कर्स्टन, कोहली-शास्री या जोड्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. आता या जोड्यांमध्ये रोहित आणि राहुल या जोडीचाही समावेश होईल. राहुल यांनी रोहित शर्माविषयीच्या भावनाही पहिल्यांदाच उघडपणे मांडल्या. ‘खेळाडू म्हणून रोहीत कसा आहे, मी वेगळं सांगायला नको. पण, मला रोहित व्यक्ती म्हणून अधिक भावला. त्याची काळजी, समर्पण आणि आदर हे गुण मी पाहिले. त्याने मला कायम असंच वागवलं. तो कायम अव्वल खेळाडू असेल, अव्वल कर्णधार असेल. पण, अव्वल व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्या कायम लक्षात राहील,’ असं द्रविड म्हणाले. (Rahul Dravid)

भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सोडल्यानंतर द्रविड यांना काही काळ क्रिकेटपासून दूर राहायचं आहे. मग ते आपलं आयुष्य सुरळीत सुरू करतील. (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.