ऋजुता लुकतुके
राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघात खेळत होते तेव्हा फलंदाजीच्या मजबूत फळीतील म्हणजे फॅब्युलस फोरमधील एक फलंदाज असाच त्यांचा लौकीक होता. मैदानावर तसंच मैदानाबाहेर आपल्या विनम्र वागणुकीसाठी ते प्रसिद्ध होते. आताही भारतीय संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारण्यापूर्वी काही वर्ष त्यांनी बीसीसीआयच्या बंगळुरू इथं असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अध्यक्ष म्हणून काम केलंय.
त्यामुळे आताचा क्रिकेट संघ घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि त्यानंतर आता विश्वचषक स्पर्धा आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुख्य प्रशिक्षक होण्याची जबाबदारीही उचलली. आणि आता संघाबरोबर असतानाही त्यांनी आपलं मूळ गाव बंगळुरू इथं आपला विनम्र स्वभाव आणि कुठलंही अवसान न आणलेल्या वागणुकीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
विश्वचषकातील यशस्वी भारतीय फलंदाजांविषयी माहिती देताना समालोचकांनी १९९९च्या विश्वचषकात राहुल द्रविड यांनी भारतातर्फे सर्वाधिक ४६१ धावा केल्याचा उल्लेख केला. यात त्यांनी २ शतकं आणि ३ अर्धशतकं ठोकली होती.
(हेही वाचा-Telangana Election 2023 : तेलंगणाच्या निवडणुकीत कुटुंबवादाचा पूर)
ड्रेसिंग रुममध्ये टीव्ही असल्यामुळे राहुल द्रविड यांचा झालेला उल्लेख तिथेही कळला. मग भारतीय ड्रेसिंग रुमचं वातावरणच बदललं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून द्रविड यांचं कौतुक केलं. यावर अचानक आलेल्या या शुभेच्छांमुळे सुरुवातीला द्रविड चक्क लाजल्यासारखे दिसले. आणि मग त्यांनी हात उंचावून सगळ्यांचं अभिनंदन स्वीकारलं.
पण, यात द्रविड थोडेसे अवघडलेलेच होते. तोंडावर कौतुक झाल्यावर आलेलं हे अवघडलेपण त्याचं व्यक्तित्व दाखवणारं आणि म्हणून भावणारं होतं. द्रविड यांनी प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर भारतीय संघ कसोटी विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला. तर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातही भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे.
अलीकडेच भारतीय संघाने आशिया चषक तसंच आशियाई क्रीडास्पर्धेतही विजेतेपद पटकावलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community