Rahul Dravid on SA Tour : दक्षिण आफ्रिकेत काय असेल भारतीय खेळाडूंची रणनीती, सांगतायत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंकडून विजयी कामगिरीची अपेक्षा केली आहे 

213
Rahul Dravid on SA Tour : दक्षिण आफ्रिकेत काय असेल भारतीय खेळाडूंची रणनीती, सांगतायत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 
Rahul Dravid on SA Tour : दक्षिण आफ्रिकेत काय असेल भारतीय खेळाडूंची रणनीती, सांगतायत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा आतापर्यंत खडतरच ठरला आहे. यावेळी मात्र भारतीय संघ तिथे ३ एकदिवसीय, टी-२० तसंच २ कसोटी सामने खेळेल तेव्हा संघाचं मनोधैर्य उंचावलेलं असेल. (Rahul Dravid on SA Tour) कारण, या तीनही प्रकारात सध्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आहे. आणि भारतीय संघासमोर आफ्रिकेतील आधीचं अपयश पुसून टाकण्याची संधी असेल.

पण, तिथे विजय मिळवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid on SA Tour) यांनी प्रत्येक खेळाडूकडून सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. १० डिसेंबरला भारतीय संघ तिथे आपला पहिला टी-२० सामना खेळेल. सुर्यकुमार यादव टी-२० मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असेल.

(हेही वाचा-WPL Auction 2024 : महिलांच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव कधी, कुठे होणार?)

द्रविड स्वत; आफ्रिकेत खेळताना यशस्वी ठरले आहेत. तिथल्या खेळपट्टीमध्ये चेंडूला मिळणारी अनियमित उसळी आणि मूव्हमेंट याचा चांगला अंदाज द्रविड यांना आहे. पण, तिथे खेळण्याची आव्हानंही त्यांना ठाऊक आहेक. त्यामुळेच त्यांनी खेळाडूंना १०० टक्के झोकून देण्याचं आवाहन केलं आहे.

‘सेंच्युरियन आणि जोहानसबर्गमध्ये खेळणं अजिबात सोपं नाही. आधीचा रेकॉर्डही तुम्हाला हेच सांगेल. तेव्हा फलंदाजांकडे इथं खेळताना निश्चित रणनीती हवी. आणि ती खेळपट्टीवर उतरवण्याचं कसबही हवं. त्यासाठी वेगळ्या सरावाची गरज आहे,’ असं द्रविड यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत खेळणं ही शारीरिक कसोटी आहेत. पण, त्यापेक्ष जास्त मानसिक कसोटी आहे, असं द्रविड यांना वाटतं. आणि म्हणूनच त्यांनी खेळाडूंना प्रत्येकाने सामना जिंकण्यासाठी शंभर टक्के योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.