Rahul Dravid : राहुल द्रविडने अतिरिक्त बोनस नाकारला, सहाय्यक प्रशिक्षकांइतकेच पैसे घेणार

Rahul Dravid : राहुल द्रविडला ५ कोटी तर सहाय्यक प्रशिक्षकांना बीसीसीआयने २.५ कोटी रुपये देऊ केले आहेत.

298
Rahul Dravid : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा मावळता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या वागण्याने पुन्हा एकदा संघ सहकाऱ्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मिळून १२५ कोटी रुपयांचं बक्षीस देऊ केलं. यात मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला इतर खेळाडूं इतकेच म्हणजे ५ कोटी रुपये मिळणार आहेत. तर त्याचे सहाय्यक विक्रम राठोड, टी दिलीप आणि पारस म्हांब्रे यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळणार आहेत. (Rahul Dravid)

यावर राहुल द्रविडने ठाम भूमिका घेताना त्याला मिळणारे अतिरिक्त २.५ कोटी रुपये नाकारले आहेत. सगळ्यांना समान म्हणजे २.५ कोटी रुपये मिळावेत अशी भूमिका मांडली आहे. ‘राहुलला त्याच्या सहाय्यकांइतकाच मोबदला हवा होता. बीसीसीआयने त्याच्या मताचा आदर केला आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे. (Rahul Dravid)

राहुल द्रविडने अशाप्रकारची भूमिका पहिल्यांदा नाही घेतलेली. २०१८ मध्ये १८ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक असताना द्रविडने एकसमान मोबदल्याची शिफारस केली होती. तेव्हा द्रविडला ५० लाख रुपये, खेळाडूंना ३० लाख रुपये आणि द्रविडच्या सहाय्यकांना प्रत्येकी २० लाख रुपये प्रस्तावित होते. पण, द्रविडने एकसमान मोबदल्याची मागणी केली. अखेर बीसीसीआयने सर्वांनाच प्रत्येकी २५ लाख रुपये दिले होते. आता द्रविडने पुन्हा एकदा नेतृत्व आणि संघातील एकोप्याची शिकवण घालून दिली आहे. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Parliament Session : आता पालकांची जबाबदारी फक्त मुलांचीच नाही; जावई, सून, नातवंडांचीही असणार; केंद्राचे नवे विधेयक)

राहुल द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून कारकीर्दीवर दृष्टिक्षेप,
मिळवलेलं यश
  • टी-२० विश्वचषकातील विजेतेपद
  • एकदिवसीय व कसोटीत भारतीय संघाला अव्वल स्थानापर्यंत नेणं
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विजय
  • द आफ्रिका, न्यूझीलंड व श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय
  • वेस्ट इंडिजविरुद्ध परदेशात मालिका विजय
  • आशिया चषकातील विजय
  • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४-१ ने विजय (Rahul Dravid)
पराभवाचे क्षण
  • द आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत १-० असा आघाडीनंतर पराभव
  • २०२२ च्या टी-२० विश्वचषकात उपान्त्य फेरीत पराभव
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव
  • एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.