Rahul Dravid : आयपीएल सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडचा खेळाडूंच्या नावे संदेश

इंग्लंड विरुद्धची मालिका ४-१ ने जिंकल्यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाला उद्देशून प्रेरणादायी भाषण केलं आहे. 

164
Rahul Dravid : आयपीएल सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडचा खेळाडूंच्या नावे संदेश
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने (Indian team) इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकल्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) संघावर भलतेच खुश आहेत. धरमशाला कसोटीनंतर खेळाडू आयपीएलसाठी आपापल्या फ्रँचाईजीमध्ये पांगतील. त्यापूर्वी द्रविड यांनी संघाला उद्देशून उत्स्फूर्त आणि उत्कट संदेश दिला आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर खात्यावर हा संदेश शेअर केला आहे. (Rahul Dravid)

राहुल (Rahul Dravid) यांनी या संदेशात खासकरून यशस्वी जयसवाल, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप या युवा खेळाडूंचं कौतुक केलं आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका आव्हानात्मकच असते. आणि याचा अनुभव घेत असताना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न दवडल्याबद्दल राहुलने खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. (Rahul Dravid)

‘आपण जिंकू किंवा नाही जिंकणार. पण, प्रत्येक कसोटी मालिका तुम्हाला खूप काही शिकवत असते. शिवाय ही मालिका ५ कसोटींची होती. यात कसोटीचे क्षणही जास्त येणार. पारडं सतत वर खाली होत राहणार. अशावेळी खेळाडू म्हणून, संघ म्हणून आणि माणूस म्हणूनही आपण खूप काही शिकत असतो. आणि या कसोटीत या सगळ्या क्षणांना आपण पुरून उरलो. मैदानावर आव्हानं होती, तशाच समस्या मैदानाबाहेरही होत्या. आपण संघ म्हणून आपण त्यांच्यावर मात केली,’ असं राहुल (Rahul Dravid) यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही; कोस्टल रोडवरून फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका)

राहुल यांनी खेळाडूंना दिला हा सल्ला 

युवा खेळाडूंचं राहुलने (Rahul Dravid) कौतुक तर केलंच. पण, बरोबर सावधानतेचा प्रेमळ सल्लाही दिला. ‘युवा खेळाडूंना एकच सांगणं आहे. की, तुम्ही एकमेकांची संगत सोडू नका. तुम्ही फलंदाज असा किंवा गोलंदाज, तुम्हाला इतरांची मदत कायम लागणार आहे. एकत्रच तुमचा विकास होईल. एकमेकांच्या बरोबर राहा. आणि यशस्वी व्हा,’ असं राहुल म्हणाले. (Rahul Dravid)

घरच्या मैदानावर झालेल्या या मालिकेनंतर समोर नवीन आणि आणखी कठीण आव्हानं उभी राहणार आहेत. त्यासाठी तयार राहा असा इशाराही शेवटी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी खेळाडूंना दिला आहे. (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.