-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा संमित द्रविडची (Samit Dravid) भारताच्या १९ वर्षाखालील संघात वर्णी लागली आहे. आगामी ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध मालिकेत संमित खेळेल. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ एकदिवसीय सामने आणि २ चार दिवसीय सामने खेळणार आहेत. २१, १३ आणि २६ सप्टेंबरला एकदिवसीय मालिका पार पडेल. आणि हे सामने पुद्दुचेरी इथं होतील. त्यानंतर ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरला चेन्नई इथं दोन्ही चार दिवसीय सामने होतील.
एकदिवसीय मालिकेत मध्य प्रदेशचा मोहम्मद ओमान भारतीय १९ वर्षांखालील संघाचं नेतृत्व करेल. तर कसोटी मालिकेत नेतृत्वाची धुरा सोहम पटवर्धनकडे सोपवण्यात आली आहे. संमित (Samit Dravid) हा डावखुरा फलंदाज आणि अष्टपैलू तेज गोलंदाज आहे. सध्या तो महाराजा टी-२० लीगमध्ये म्हैसूर वॉरिअर्स संघाकडून खेळत आहे. आतापर्यंत महाराजा चषकात त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. आणि ३३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
(हेही वाचा – Dadar Hawker : हप्ता वाढला, फेरीवाल्यांवरील कारवाई बंद)
🚨 NEWS 🚨
India U19 squad and fixtures announced for multi-format home series against Australia U19.
Squad for one-day series: Rudra Patel (VC) (GCA), Sahil Parakh (MAHCA), Kartikeya KP (KSCA), Mohd Amaan (C) (UPCA), Kiran Chormale (MAHCA), Abhigyan Kundu (WK) (MCA), Harvansh…
— BCCI (@BCCI) August 31, 2024
पण, या हंगामात सुरुवातीला झालेल्या कूचबिहार करंडक स्पर्धेत कर्नाटकला विजय मिळवून देण्यात संमितने मोठा वाटा उचलला होता. १८ वर्षीय संमितने ३६२ धावा केल्या. यात जम्मू व काश्मीर संघाविरुद्ध त्याने ९८ धावांचं योगदान दिलं. गोलंदाज म्हणूनही या स्पर्धेत तो चमकला. आणि त्याने १६ बळी मिळवले. या अष्टपैलू कामगिरीमुळेच भारतीय संधात त्याची वर्णी लागली आहे. अलीकडेच संमित (Samit Dravid) आणि त्याचे वडील राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या फलंदाजीच्या शैलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही फटके दोघं किती सारखे खेळतात याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community