राहूल द्रविडसह, विराट-रोहितने सोडल्या बिझनेस क्लासच्या सीट्स; कारण वाचून तुम्ही सुद्धा कराल कौतुक

142

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. फलंदाजांप्रमाणे विजय मिळवण्यासाठी गोलंदाज सुद्धा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागत आहे. अशावेळी गोलंदाजांना जास्त त्रास होऊ नये म्हणून भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनी विशेष काळजी घेतली आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्तानचा फायनलमध्ये प्रवेश!)

सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी त्यांची बिझनेस क्लासची सीट मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांना दिली. बिझनेस क्लासमध्ये आरामात पाय पसरून झोपू शकतो आणि तुलनेने जास्त आराम मिळतो. म्हणून राहुल द्रविडसह, विराट-रोहितने त्यांच्या बिझनेस क्लासच्या सीट्स गोलंदाजांना दिल्या. गुरूवारी भारतीय संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे.

बिझनेस क्लासच्या किती तिकीट मिळतात?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला बिझनेस क्लासच्या फक्त ४ तिकीट्स मिळतात. बहुतांश संघ या ४ सीट्स कोच, कर्णधार, उपकर्णधार, मॅनेजर किंवा संघातील सिनियर खेळाडूला देतात. परंतु मुख्यत: वेगवाग गोलंदाजाला खेळपट्टीवर फिट असणे गरजेचे आहे. म्हणूनच भारतीय संघाने एकमताने निर्णय घेत या सीट्स गोलंदाजांना दिल्या. भारतीय संघातील वरिष्ठांच्या या कृतीमुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.