Rahul Dravid’s Son in IPL 2025? आयपीएलच्या पुढील हंगामात राहुल द्रविडचा मुलगा समितची एंट्री?

Rahul Dravid’s Son in IPL 2025? समित सध्या कर्नाटकमधील महाराजा टी-२० स्पर्धेत खेळत आहे.

92
Rahul Dravid’s Son in IPL 2025? आयपीएलच्या पुढील हंगामात राहुल द्रविडचा मुलगा समितची एंट्री?
  • ऋजुता लुकतुके

महाराजा टी-२० लीग सध्या कर्नाटकमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्स संघाकडून राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा समित द्रविड (Samit Dravid) खेळत आहे. १६ वर्षांच्या समितच्या कामगिरीकडे यंदा सगळ्यांचंच लक्ष होतं. कारण, या स्पर्धेतून तो आगामी आयपीएलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल असं बोललं जात आहे. समितचे काही फटके हे थेट त्याचे वडील राहुल द्रविडशी मिळतेजुळते आहेत. पण, मैदानातील त्याची कामगिरी मात्र यावेळी फारशी चांगली झालेली नाही.

समित (Samit Dravid) महाराजा टी-२० लीगमध्ये करुण नायरच्या नेतृत्वाखाली म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना दिसत आहे. एकीकडे करुण नायरने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे समितला विशेष काही करता आलेले नाही. आतापर्यंत त्याने ५ सामने खेळले आहेत. या लीगमध्ये त्याने ५, १२, २, १६ आणि ३३ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी केवळ १३.५ आहे. (Rahul Dravid’s Son in IPL 2025?)

(हेही वाचा – ‘शरद पवार सध्या पावसात जास्त भिजतायेत’, Sanjay Shirsat यांची तिरकस टीका)

महाराजा टी-२० लीग २०२४ मधील पहिला सामना म्हैसूर वॉरियर्स आणि गुलबर्गा मिस्टिक्स यांच्यात खेळला गेला. समितच्या (Samit Dravid) संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र त्याच्या एका शॉटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्ध त्याने लेग साइडवर दमदार षटकार ठोकला होता. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या या शॉटचे कौतुक केले. त्याचा हा शॉट सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

(हेही वाचा – Jammu Kashmir Assembly Election : भाजपाचे ‘हे’ असतील स्टार प्रचारक)

समित द्रविडला (Samit Dravid) या लीगमध्ये चमकदार कामगिरी करून आयपीएल लिलावात स्वत:ला सादर करण्याची संधी होती. मात्र त्याने आपल्या कामगिरीने निराशा केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक संघ त्याच्यावर सट्टा लावू शकतात. समित द्रविड कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. त्याने २०२३-२४ कूचबिहार ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता. याशिवाय, लँकेशायर संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात तो कर्नाटक क्रिकेट मंडळाच्या संघाचा भाग होता. (Rahul Dravid’s Son in IPL 2025?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.