- ऋजुता लुकतुके
कुस्ती फेडरेशनच्या (Wrestling Federation) निवडणुकीवरून देशात वाद सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हरयाणाला जाऊन बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि इतर कुस्तीपटूंची भेट घेतली. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
कुस्ती फेडरेशनची (Wrestling Federation) गेल्या आठवड्यात झालेली निवडणूक कमालीची गाजली. आणि खेळाडूंचा विरोध असलेले संजय सिंग ही निवडणूक जिंकल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने तीनच दिवसांत नवीन कार्यकारिणीही बरखास्त केली आहे. हा सगळा वाद एकीकडे सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच हरयाणात झज्जर तालुक्यात छरा गावात जाऊन ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि त्याच्या साथीदारांची भेट घेतली. गावातील विरेंद्र आखाड्यात ही भेट झाली. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बजरंग आणि इतर कुस्तीपटूंबरोबर तासभर गप्पा मारल्या. आणि कुस्ती सुरू असलेल्या वादावर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बजरंग सह विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंबरोबरच आणखी काही खेळाडूंचा संजय सिंग यांच्या नियुक्तीला विरोध होता. हे खेळाडू मागचं वर्षभर दिल्लीत फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात आंदोलन करत होते. शरण यांचा पाठिंबा असलेले संजय सिंग म्हणूनच खेळाडूंना नको होते. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
५३ वर्षीय राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कुस्तीपटूंबरोबर गप्पा मारण्याबरोबरच आखाड्यातही वेळ घालवला. बजरंग पुनियाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
Training session with @RahulGandhi https://t.co/uDNHgiwlHM pic.twitter.com/wa02n7Ecbk
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 28, 2023
(हेही वाचा – UPI App Payment Alert : नवीन वर्षात ‘यांचे’ Gpay, Paytm आणि Phonepe अकाऊंट होणार बंद)
गांधी यांची भेट महत्त्वाची आणि खेळाडूंना पाठिंबा दर्शवणारी
राहुल गांधी (Rahul Gandhi) या व्हिडिओत बजरंग आणि इतर कुस्तीपटूंना जितू-जित्सूची प्रात्यक्षिकं दाखवताना दिसत आहेत. गांधी यांची भेट महत्त्वाची आणि खेळाडूंना पाठिंबा दर्शवणारी मानली जात आहे. कारण, या भेटीच्या एकच दिवस आधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी संजय सिंग यांच्या निवडीविरोधात खेलरत्न पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
बजरंगने आपला पद्मश्री पुरस्कारही परत केला. या खेळाडूंचा कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांच्या निवडीला विरोध आहे. संजय सिंग हे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शऱण यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सिंग यांच्या रुपाने शरण यांचंच फेडरेशन वरील वर्चस्व कायम राहील, असा खेळाडूंचा आरोप आहे. ब्रिजभूषण शरण यांच्यावर ७ खेळाडूंनी विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यातील या सगळ्या घडामोडींनंतर क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित कुस्ती फेडरेशन बरखास्त करत तीन सदस्यीय तात्पुरती समिती बसवली आहे. (Rahul Gandhi Meets Wrestlers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community