ऋजुता लुकतुके
आगामी आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड जवळ आली आहे. तोपर्यंत (Rahul – Shreyas Fitness) के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या तंदुरुस्तीच्या चर्चा थांबत नाहीएत. विंडिजविरुद्धची टी-२० मालिका गमावल्यानंतर अष्टपैलू खेळाडूंविषयी बोलताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दोघांच्या पुनरागमनाविषयी सकारात्मक सुतोवाच केलं.
पण, प्रत्यक्षात बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत असलेले दोघंही (Rahul – Shreyas Fitness) सामने खेळण्यासाठी तयार आहेत की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
अलीकडेच कर्णधार रोहीत शर्माने चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी श्रेयससारखा (Rahul – Shreyas Fitness) सातत्यपूर्ण खेळाडू दुसरा कोणी झालेला नाही, असं भाष्य एका मुलाखतीत केलं होतं. पण, के एल राहुल फलंदाजीचा सराव करत असला तरी ५० षटकं यष्टीरक्षण करण्यासाठी तो तंदुरुस्त आहे का हा प्रश्न आहे.
अशा चर्चा सुरू असताना दोघंही (Rahul – Shreyas Fitness) बंगळुरू मधल्या आपल्या सरावाचे व्हीडिओ टाकून सगळ्यांना अधून मधून चक्रावून सोडत आहेत.
सिम्युलेटरसह सरावाबरोबरच दोघंही (Rahul – Shreyas Fitness) अलीकडे एका सराव सामन्यात खेळले. मुफद्दल वोहरा यांनी हा व्हिडिओ ट्विटही केला.
KL Rahul and Shreyas Iyer in the practice match.
Rishabh Pant watching them! pic.twitter.com/aDWVc52zOm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 14, 2023
अजित आगरकरच्या निवड समितीने अलीकडेच सामन्यासाठी तंदुरुस्तीचा आपला निकष स्पष्ट केला होता. त्यांच्यामते, पूर्ण ५० षटकं मैदानावर घालवू शकणं याला सामन्यासाठीची तंदुरुस्ती म्हंटल जाईल. फक्त फलंदाजी करण्याची क्षमता आली म्हणजे अशा खेळाडूचा विचार होणार नाही. राहुलने ५० षटकं यष्टीरक्षणही केलं पाहिजे.
खरंतर आशिया चषकासाठी संघाची निवड पूर्वीच अपेक्षित होती. पण, राहुल आणि श्रेयस (Rahul – Shreyas Fitness) यांना तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ देण्याच्या इराद्यानेच निवड समितीला वेळ वाढवून देण्यात आलाय. आता या आठवड्याचा मध्य किंवा अखेरीस संघ निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community