RCB New Captain : विराट कोहलीच्या नकारानंतर रजत पाटीदार बंगळुरूचा नवीन कर्णधार

आयपीएलच्या नवीन हंगामासाठी बंगळुराचा कर्णधार बदलला आहे.

50
RCB New Captain : विराट कोहलीच्या नकारानंतर रजत पाटीदार बंगळुरूचा नवीन कर्णधार
RCB New Captain : विराट कोहलीच्या नकारानंतर रजत पाटीदार बंगळुरूचा नवीन कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या नवीन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार होता. पण, त्याने अचानक माघार घेतल्यानंतर आता नवीन कर्णधार म्हणून रजत पाटीदारची (Rajat Patidar) नियुक्ती झाली आहे. विराटबरोबर फ्रँचाईजीने राखून ठेवलेल्या ४ खेळाडूंपैकी एक रजत आहे. आणि अलीकडेच विजय हजारे आणि सय्यक मुश्ताक अली स्पर्धेत त्याने स्थानिक संघाचं यशस्वी नेतृत्व केलं आहे. त्यामुळे रजतच्या नावावर गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब झालं आहे. विराटने (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यावर लगेचच संघ व्यवस्थापनाला कर्णधारपदाची जबाबदारी नको असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर मागचे १५ दिवस बंगळुरू फ्रँचाईजीचा नवीन कर्णधाराचा शोध सुरू होता. अखेर रजतचं (Rajat Patidar)  नाव जाहीर झालं आहे. विराटनेही (Virat Kohli) नवीन कर्णधाराला पाठिंबा दिला आहे. बंगळुरूने मेगा लिलावापूर्वी ११ कोटी रुपये देऊन रजतला आपल्याकडे कायम राखलं होतं. (RCB New Captain)

(हेही वाचा – Shubman Gill : शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत पोहोचला दुसऱ्या स्थानावर)

३१ वर्षीय रजत पाटीदारने (Rajat Patidar) आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ सामन्यांत ३४ धावांच्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत. लीगमध्ये त्याने आतापर्यंत १ शतक आणि ७ अर्धशतकं केली आहेत. मागचा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम होता. बंगळुरू फ्रँचाईजीला उपान्त्य फेरीपर्यंत नेण्यात विराटच्या बरोबरीने त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्यावर्षी तो भारताकडून ३ कसोटी सामनेही खेळला. (RCB New Captain)

(हेही वाचा – अखेर 36 वर्षांनी दिलासा; रामजन्मभूमी आंदोलनाच्या खटल्यातून मंत्री Mangal Prabhat Lodha यांची निर्दोष सुटका)

स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून या फ्रँचाईजीकडून विराट कोहली (Virat Kohli) खेळतो. त्यामुळे या फ्रँचाईजीची लोकप्रियता आणि चाहता वर्ग मोठा आहे. पण, त्यांनी एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. तीनदा अंतिम सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अलीकडच्या काळात विराट कोहलीने (Virat Kohli) नेतृत्व सोडल्यानंतर संघात अनेक बदल झाले. मागच्या तीन हंगामात फाफ डू प्लेसी (Faf du Plessis) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांनी संघाचं नेतृत्व केलं. पण, हे दोन्ही खेळाडू आता लीगमध्ये नाहीत. गेल्यावर्षी फेब्रुवारीत खेळाडूंचा मेगा लिलाव झाला, त्यानंतरही संघाकडे कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यामुळे संघ प्रशासनाने विराटला पुन्हा एकदा विनंती केली होती. ती सुरुवातीला त्याने मान्य केली. पण, अलीकडे फलंदाजीतील फॉर्म पाहता त्याने फलंदाजीवरच लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं असावं. (RCB New Captain)

विराटने रजत पाटिदारला (Rajat Patidar) नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर विराट संघाला मार्गदर्शन करण्यात पुढे असेल असं बंगळुरू फ्रँचाईजीने म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.