Ramita Jindal in Final : १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता आणि अर्जुन यांची दुपारी अंतिम फेरी

Ramita Jindal in Final : पात्रता फेरीत रमिता पाचवी आली

98
Ramita Jindal in Final : १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता आणि अर्जुन यांची दुपारी अंतिम फेरी
Ramita Jindal in Final : १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता आणि अर्जुन यांची दुपारी अंतिम फेरी
  • ऋजुता लुकतुके

मनु भाकर १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकण्यापूर्वी भारताची आणखी एक तरूण आणि कुशल रायफल नेमबाज रमिता जिंदालनेही १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. ६३१.५ गुण मिळवून रमिता पाचवी आली. पहिले ८ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचतात. याच प्रकारात भारताची दुसरी नेमबाज इलावेनिल मात्र दहावी आली. (Ramita Jindal in Final)

आशियाई क्रीडास्पर्धेतही रमिताने कांस्य जिंकलं होतं. विशेष म्हणजे पात्रता फेरीत पहिल्या ५ ते ६ फेऱ्यांमध्ये इलावेनिल सातत्यपूर्ण नेम साधत होती. आणि तिने पाचवा क्रमांक राखला होता. आणि रमिता पहिल्या आठांत नव्हती. पण, शेवटच्या फैरींमध्ये तिने जोर मारला. सहाव्या फैरीत कलाटणी मिळाली. ऑलिम्पिक निवड चाचणीदरम्यान रमिताने या प्रकारात ६३६.४ गुण नोंदवत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ०.१ गुणांनी तिने जुना विक्रम मोडला होता. त्यामुळे आताही तिच्याकडून अपेक्षा होत्या. आणि अखेर सहाव्या फैरीत तिला सूर गवसला. शेवटच्या २ फैरी १०५.३ आणि १०५.७ अशा भक्कम झाडत तिने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Ramita Jindal in Final)

(हेही वाचा – Ind vs SL, 2nd T20 : पावसाने व्यत्यय आणलेला सामना जिंकत भारताची मालिकेत २-० ने विजयी आघाडी)

कोरियाची बॅन हियोजिनने पात्रता स्तरावरील ऑलिम्पिक उच्चांक रचताना पात्रता फेरीत ६३४.५ गुण मिळवले. १० मीटर एअर रायफलची अंतिम फेरी सोमवारी दुपारी एक वाजता सुरू होईल. तर पुरुषांमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबूतानेही (Arjun Babuta) अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या पात्रता फेरीत तो ६३०.१ गुणांसह अंतिम फेरी गाठली आहे. सध्या तो पाचव्या क्रमांकावर आहे. आणि सोमवारी दुपारी साडेतीन वाजता अंतिम फेरी होणार आहे.

सोमवारी सकाळी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र सांघिक पात्रता लढतही होणार आहे. मनु भाकर इथं पुन्हा एकदा मैदानात उतरेल. सोमवारी भारतीय खेळाडूंसाठी दोन महत्त्यवाच्या पदक फेऱ्या होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.