Ranji Trophy 2024 : रणजी करंडकात एकाच दिवशी संघातील दोघांची त्रिशतकं! गोव्याच्या खेळाडूंची धावांची लूट

Ranji Trophy 2024 : अरुणाचल प्रदेश विरुद्ध गोव्याच्या फलंदाजांनी दमादर कामगिरी केली आहे. 

42
Ranji Trophy 2024 : रणजी करंडकात एकाच दिवशी संघातील दोघांची त्रिशतकं! गोव्याच्या खेळाडूंची धावांची लूट
  • ऋजुता लुकतुके

रणजी हंगामाच्या या टप्प्यातील शेवटचे साखळी सामने सध्या देशभरात विविध ठिकाणी सुरू आहेत. यानंतर पुढचा टप्पा थेट जानेवारी महिन्यात होणार आहे. शेवटच्या टप्प्यात गुरुवारी एकाच दिवशी रणजी करंडकात तब्बल तीन त्रिशतकं पाहायला मिळाली आणि यातील दोन एकाच सामन्यात एकाच संघातील खेळाडूंनी केलेली होती. गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात कश्यप बाकले आणि स्नेहल कौथंकर या दोघांनी एकाच दिवशी त्रिशतकं झळकावली. गोवा आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरु आहे. गोवा संघाच्या कश्यप बाकले आणि स्नेहल कौथंकर या दोघांनी त्रिशतक झळकावलं. कश्यप बाकले यानं २६९ चेंडूंमध्ये ३०० धावा केल्या. तर, स्नेहल कौथंकरने २१५ चेंडूंमध्ये नाबाद ३१४ धावा केल्या. याच सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. (Ranji Trophy 2024)

(हेही वाचा – ATP World Finals 2024 : एटीपी अंतिम फेरीत यानिक सिनर, टेलर फ्रिट्झ यांनी गाठली उपांत्य फेरी)

गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश या मॅच अनेक विक्रमांची नोंद झाली. अरुणाचल प्रदेशचा संघ पहिल्या डावात ८४ धावांवर बाद झाला. यानंतर गोवा संघानं पहिल्या डावात ८९ ओव्हरमध्ये २ बाद ७१५ धावा केल्या. गोवा संघानं ९.९४ च्या रनरेटनं धावा केल्या. दोघांनी रणजी ट्रॉफीतील तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी ६०७ धावा अशी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील मॅचमध्ये ५९४ धावांची भागिदारी झाली होती. स्वप्नील गुगले आणि अंकित बावणे यांच्यातील ती भागिदारी होती. गोवा संघाकडून खेळताना कश्यप बाकले आणि स्नेहल कौथंकर या दोघांनी ४४८ बॉलमध्ये ६०६ धावांची भागिदारी केली. रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत चार त्रिशतकांची नोंद झाली आहे. ही चार त्रिशतकं स्नेहल कौथंकर, कश्यप बाकले, महिपाल लोमरोर आणि चेतन बिस्ट यांनी केली आहेत. चेतन बिस्ट यानं नागालँड विरुद्ध मिझोरम या मॅचमध्ये त्रिशतक केलं होतं. (Ranji Trophy 2024)

(हेही वाचा – Karad South मध्ये मतदार इतिहास घडवणार?)

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर होता. मोहम्मद शमी पायाच्या दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर होता. रणजी ट्रॉफीत बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश लढतीच्या माध्यमातून मोहम्मद शमीनं कमबॅक केलं आहे. मोहम्मद शमीनं पहिल्या डावात मध्य प्रदेशच्या चार विकेट घेतल्या आहेत. आता हा सामना संपल्यानंतर मोहम्मद शमीचा फिटनेस तपासला जाईल. तो तंदुरुस्त असल्यास किंवा त्याला कोणताही त्रास होत नसल्यास टीम इंडियाची दारं उघडली जाऊ शकतात. (Ranji Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.