Ranji Trophy 2025 : रणजी करंडकाचा अंतिम सामना केरळ विरुद्ध विदर्भ, मुंबईची ८० धावांनी मात

केरळ संघाने पहिल्यांदाच रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली आहे.

46
Ranji Trophy 2025 : रणजी करंडकाचा अंतिम सामना केरळ विरुद्ध विदर्भ, मुंबईची ८० धावांनी मात
Ranji Trophy 2025 : रणजी करंडकाचा अंतिम सामना केरळ विरुद्ध विदर्भ, मुंबईची ८० धावांनी मात
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या रणजी स्पर्धेत केरळ विरुद्ध विदर्भ (Kerala vs Vidarbha) असा अंतिम मुकाबला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. विदर्भ संघाने साखळीतील ११ पैकी १० मुकाबले जिंकले होते. तर केरळनेही पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करताना बलाढ्य गुजरातचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला. विदर्भाने गतविजेत्या मुंबईला ८० धावांनी हरवलं. या सामन्यात विदर्भाचे फलंदाज आणि गोलंदाज अशा दोघांनीही वर्चस्व राखलं. पहिल्या डावांत मुंबईवर ११३ धावांनी आघाडी मिळवत विदर्भाने अंतिम फेरीच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकलं होतं. त्यातच दुसऱ्या डावांत त्यांनी यश राठोडच्या (Yash Rathod) १५१ धावांच्या जोरावर २९२ अशी तगदी धावसंख्या उभारली. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी चौथ्या डावांत ४०५ धावा करण्याचं कठीण आव्हान होतं.

चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात मुंबईचे ३ फलंदाज ८३ धावांतच बाद झाले होते. तिथेच सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. हे बाद होणारे फलंदाज होते आयुष म्हात्रे, अजिंक्य रहाणे आणि सिद्धेश लाड! हंगामात चांगला खेळ केलेले तीनही फलंदाज बाद झाल्यानंतर पाचव्या दिवशी फारशा आशा नव्हत्याच. पण, तळाच्या पाच फलंदाजांनी मिळून २१० धावा वाढवल्या. पण, यामुळे मुंबईचा पराभव फक्त लांबला असंच म्हणावं लागेल. शार्दुल ठाकुरने पाचव्या दिवशी सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर शम्स मुलानीने ४६ धावा केल्या. अगदी तळाच्या रॉयस्टन डायसनेही २३ धावा केल्या. आणि दहाव्या गड्यासाठीही ५२ धावांची भागिदारी झाली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. आणि विदर्भाने ८० धावांनी विजय मिळवलाच.

(हेही वाचा – Shri Krishna Janmabhoomi साठी आता ऑस्ट्रेलियातून राबवणार चळवळ; भव्य परिसंवादातून सुरु होणार मोहीम)

दुसऱ्या उपान्त्य सामन्यात केरळने गुजरातचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला. हा सामना फलंदाजांनी गाजवला. मोहम्मद अझहरुद्दीनच्या (Mohammad Azharuddin) १७७ धावांच्या जोरावर केरळने पहिल्या डावांत ४५७ धावा केल्या. आणि पुढे त्याच निर्णायक ठरल्या. गुजरातचा पहिला डावही रंगला. सलामीवीर प्रियांक पांचालने १४८ तर जयमीत पटेलने ७९ धावा करत गुजरातचं आव्हान जीवंत ठेवलं होतं. आणि गुजरातची अवस्था ९ बाद ४४६ असताना शेवटच्या जोडीनेही आणखी ९ धावांची भर घातली. पण, इतक्यात आदित्य सरवटेनं अर्झान नागवासवालाला १० धावांवर बाद केलं आणि गुजरातचा डाव ४४५ धावांवर संपला. पहिला डावच ४ दिवस चालल्यामुळे पहिल्या डावांतील आघाडी निर्णयाक ठरणार हे स्पष्ट होतं. आणि तिथेच सरवटेचा हा बळी केरळला तारणारा ठरला. (Ranji Trophy 2025)

(हेही वाचा – Tesla in India ? टेस्लाच्या भारतातील प्रवेशाला एप्रिलचा मूहूर्त? सुरुवातीला २ मॉडेल लाँच करण्याची शक्यता)

आता रणजी करंडकाचा (Ranji Trophy 2025) अंतिम सामना येत्या २६ फेब्रुवारीपासून नागपूरच्या जामठा मैदानात सुरू होणार आहे. विदर्भाला गेल्यावर्षी अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. तर केरळने पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. त्यांना पहिल्याच प्रयत्नात करंडकावर नाव कोरायचं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.