-
ऋजुता लुकतुके
रणजी करंडकात (Ranji Trophy) मुंबईचा संघ ए गटातील आपला शेवटचा साखळी सामना येत्या ३० जानेवारीला खेळणार आहे. मेघालय विरुद्धचा हा सामना मुंबईतच होणार आहे. पण, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर हा सामना खेळू शकणार नाहीत. तर अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेची (Shivam Dube) निवड इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी झाली आहे. त्यामुळे तो ही उपलब्ध असणार नाही. त्यामुळे बाद फेरीसाठी बोनससह ७ गुण मिळवणं ही मुंबईची गरज असताना स्टार खेळाडू मात्र खेळणार नाहीएत.
बीसीसीआयचे (BCCI) नमन वार्षिक पुरस्कार १ फेब्रुवारीला होणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी रोहित, यशस्वी आणि श्रेयस उपस्थित राहतील. तर २ फेब्रुवारीपासून एकदिवसीय संघाचं छोटेखानी शिबीर नागपूर इथं होणार आहे. त्यासाठी हे खेळाडू नागपूरला रवाना होतील. त्यामुळे यातील एकही खेळाडू शेवटच्या साखळी सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून नागपूरला सुरू होत आहे.
(हेही वाचा – Kothaligad Fort वर जायचंय? पण रस्ता माहिती नाही? मग हा लेख वाचा)
ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर रोहित, यशस्वी, ऋषभ, जाडेजा व शुभमन हे खेळाडू रणजी सामन्यात खेळले. पण, जाडेजा आणि शुभमनचा अपवाद वगळता इतर खेळाडू रणजीतही फ्लॉपच ठरले आहेत. मुंबईने तर जम्मू व काश्मीर विरुद्ध सामना गमावला. आणि यात रोहितने दोन्ही डावांत ६ व २८, श्रेयसने ११ व १७, यशस्वीने ४ व २६ तर शिवम दुबे (Shivam Dube) दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. (Ranji Trophy)
यंदाच्या हंगामात गतविजेत्या मुंबईवर साखळीतच गारद होण्याची टांगती तलवार आहे. संघाचे २२ गुण झाले असून जम्मू काश्मीर २९ तर बडोदे २६ गुणांसह मुंबईच्या पुढे आहेत. या दोन संघांना बाद फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. मुंबईकडून स्टार खेळाडू खेळणार नसल्यामुळे आयुष म्हात्रे आणि सूर्यांश शेडगे यांना संघात पुन्हा एकदा स्थान मिळू शकतं. (Ranji Trophy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community