Ravichandran Ashwin : रवीचंद्रन अश्विनला खुणावताहेत कसोटीतील ‘हे’ ५ विक्रम

Ravichandran Ashwin : अश्विन या हंगामातील भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे.

133
Ashwin on New Zealand Debacle : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुमची अशी होती अवस्था…
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अष्टपैलू फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनसाठी (Ravichandran Ashwin) यंदाचं वर्षं हे विक्रमांचं वर्ष आहे. गेल्या हंगामात त्याने कसोटीतील आपले ५०० बळी पूर्ण केले. आणि तेव्हापासून त्याचा फॉर्मही परतलाय. मैदानावर त्याने पाऊल ठेवलं की, नवीन विक्रमही घडतोय. अश्विनला पुढील चार कसोटी भारतीय मैदानावर खेळायच्या आहेत. त्यामुळे अश्विनच भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असणार आहे. आणि अश्विनलाही विक्रमाच्या संधी आहेत.

डावांत ५ बळी घेण्याच्या बाबतीत अश्विन फक्त शेन वॉर्नपेक्षा मागे आहे. त्यातच दुसऱ्या डावांत सर्वाधिक बळी घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. आणि नवीन हंगाम सुरू होत असताना आणखी सहा विक्रम नावावर करण्याची संधी अश्विनकडे आहे.

(हेही वाचा – Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी)

१. कसोटीच्या दुसऱ्या डावांत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन (Ravichandran Ashwin) भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. आता कसोटीतींल चौथ्या डावांत १०० बळी पूर्ण करण्यासाठी अश्विनला आणखी फक्त एक बळी हवा आहे. कसोटीच्या चौथ्या डावांत त्याने आतापर्यंत ९९ बळी टिपले आहेत.

२. आयसीसी कसोटी अजिंक्यपद (२०२३-२५) हंगामात सगळ्यात जास्त बळी मिळवणारा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनच होऊ शकतो. सध्या या हंगामात ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ५२ बळींसह आघाडीवर आहे. पण, अश्विनने आगामी ४ कसोटींत आणखी ४ बळी मिळवले तर तो हेझलवूडला मागे टाकू शकतो. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तर अश्विन आणि हेझलवूड आमने सामने येतील.

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!)

३. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावांत पाच बळी घेण्याची कामगिरी शेन वॉर्नने एकूण ३७ वेळा केली आहे. या बाबतीत तोच गोलंदाजांमध्ये सगळ्यात पुढे आहे. पण, ३८ वर्षीय अश्विनकडे वॉर्नला मागे टाकण्याची संधी आहे. आणखी एकदा ५ बळी घेतले तर अश्विन (Ravichandran Ashwin) वॉर्नशी बरोबरी करेल. आणि त्यानंतर वॉर्नला तो मागे टाकू शकेल.

४. आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केल्यानंतर या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिऑनने आतापर्यंत १८७ बळी मिळवले आहेत. तर अश्विनच्या खात्यात आहेत १८० बळी. म्हणजेच आणखी ७ बळी घेतल्यावर अश्विन लिऑनला मागे टाकेल. आणि अश्विन स्पर्धेच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज बनेल.

(हेही वाचा – बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर…)

५. अश्विन सध्या आठवा सगळ्यात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. सध्या अश्विनच्या (Ravichandran Ashwin) खात्यात ५२२ कसोटी बळी आहेत. आणखी ९ बळी घेऊन तो ५३१ वर गेला तर तो नॅथन लिऑनला मागे टाकेल. आणि यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर पोहोचेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.