Ravindra Jadeja : टी-२० निवृत्तीनंतर जाडेजाच्या एकदिवसीय कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह?

Ravindra Jadeja : टी-२० क्रिकेटमधून जाडेजा आधीच निवृत्त झाला आहे. 

130
Ravindra Jadeja : टी-२० निवृत्तीनंतर जाडेजाच्या एकदिवसीय कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह?
  • ऋजुता लुकतुके

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा एकदिवसीय संघातून गायब झालेल्या खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजाचं नाव प्रामुख्याने घ्यायला हवं. मागच्या १० वर्षांत खरंतर तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. पण, लंका दौऱ्यात त्याचं नाव नसल्यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह असल्याचं दिसतंय. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांना २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकासाठी संघ उभारणी करायची आहे. त्यांना दिलेलं ते पहिलं काम आहे. अशावेळी त्यांच्याकडे वेळही कमी आहे. पुढील दीड वर्षांसाठीच्या संघात जाडेजाला स्थान मिळू शकेल का हा प्रश्नच आहे. (Ravindra Jadeja)

बीसीसीआयच्या एका सूत्रांनी याविषयी मीडियाशी नाव न उघड करण्याच्या बोलीवर चर्चा केली. ‘चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघ फक्त ६ एकदिवसीय सामने खेळणार आहे. यातील ३ श्रीलंकेविरुद्ध आहेत. अशावेळी जाडेजाचा बदली खेळाडू कोण असेल यावर निवड समितीला जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळेल. आणि दोघांपैकी एकाची निवड अष्टपैलू फिरकीपटू म्हणून होईल, अशी चिन्ह आहेत,’ असं हा अधिकारी म्हणाला. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा – Assam मध्ये मुस्लिम विवाहासाठी येणार नवीन कायदा; कोण-कोणत्या गोष्टींवर येणार प्रतिबंध?)

संघ प्रशासनाची याला पसंती

रवींद्र जाडेजाची एकदिवसी क्रिकेटमधील कामगिरी चोख आहे. ३२.४२ धावांच्या सरासरीने त्याने २,७५६ धावा केल्या आहेत. तर ३६ धावांच्या सरासरीने त्याने २२० बळीही घेतले आहेत. पण, आता जाडेजाचा बदली खेळाडू निवडण्यावर संघ प्रशासनाला भर द्यायचा आहे. (Ravindra Jadeja)

अक्षर पटेल हा संघ प्रशासनासमोर असलेला एक पर्याय आहे आणि आताही पसंती त्यालाच आहे. शिवाय वॉशिंग्टनची परीक्षा लंका दौऱ्यात होणार आहे. दुसरीकडे कसोटी संघात जाडेजाचा समावेश नक्की समजला जातोय. पुढील वर्षी भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेला तर रवींद्र जाडेजा कुठल्याही मैदानावर भारतीय संघात असेल हे नक्की. भारताचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. (Ravindra Jadeja)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.