Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाचे कसोटींत ३०० बळी पूर्ण, टिकाकारांना जाडेजाने दिले सडेतोड उत्तर

रवींद्र जाडेजा भारतीय संघातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे.

38
Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाचे कसोटींत ३०० बळी पूर्ण, टिकाकारांना जाडेजाने दिले सडेतोड उत्तर
Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाचे कसोटींत ३०० बळी पूर्ण, टिकाकारांना जाडेजाने दिले सडेतोड उत्तर
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सोमवारी कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला. या कामगिरीनंतर खुश झालेल्या जाडेजाने, ‘हा क्षण कायम स्मरणात राहील,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ही कामगिरी करणारा जाडेजा सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे (६१९), रविचंद्रन अश्विन (५२४), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), ईशांत शर्मा (३११) आणि झहीर खान (३११) या इतर सहा गोलंदाजांनी आतापर्यत ही कामगिरी केली आहे.

‘आपल्या देशासाठी तुम्ही अशी भरीव कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला चांगलंच वाटतं. १० वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर ही मजल मी मारली आहे. या कामगिरीचा मला नेहमी अभिमान वाटत राहील. मला खूप आनंद झालाय की, देशासाठी मी योगदान देऊ शकलो,’ या शब्दांत जाडेजाने आपला आनंद व्यक्त केला.

(हेही वाचा – LPG Gas Price Hike : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या)

३५ वर्षीय जाडेजाला सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेटचा शिक्का बसला होता. तो कसोटी खेळू शकणार नाही, असं त्याच्याबद्दल बोललं जात होतं. पण, जाडेजाने हळू हळू नेटाने कसोटी संघात जागा मिळवली आणि ती टिकवली.

(हेही वाचा – Irani Cup 2024 : सर्फराझ, यश दयाल व ध्रुव जुरेल भारतीय संघातून मुक्त, इराणी चषक खेळणार)

‘३०० बळींचा टप्पा आणखी एका गोष्टीसाठी खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवखा असताना मला एकदिवसीय क्रिकेटसाठी बनलेला फिरकीपटू असं चिडवलं जायचं. कसोटीसाठी माझा विचार व्हायचा नाही. मी कसोटी वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूवर भरपूर सराव केला. अष्टपैलूत्व सिद्ध केलं. मग कसोटीतील माझी जागा पक्की झाली. म्हणून या कामगिरीचा मला अभिमान आहे,’ असं जाडेजा या कामगिरीविषयी बोलताना म्हणाला.

भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनीही जाडेजाला फिरकीचा जादूगार म्हटलं आहे. ‘रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आपल्याबरोबर खूपसारे गुण घेऊन येतो. फक्त ३०० बळीच नाहीत तर त्याच्या खात्यात ३,००० कसोटी धावाही आहेत. असा खेळाडू संघासाठी जादूगारच ठरतो,’ असं मॉर्केल जाडेजाविषयी बोलताना म्हणाले.

आपल्या ७४ व्या कसोटीत जाडेजाने ३०० बळी आणि ३,००० कसोटी धावा जमवण्याची कामगिरी केली आहे. याबाबतीत तो इंग्लंडच्या इयॉन बॉथमपेक्षा थोडाच मागे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.