Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाची कपिल देवच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

रवींद्र जाडेजा सध्याचा देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

149
Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाची कपिल देवच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

ऋजुता लुकतुके

रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) नावावर अष्टपैलू क्रिकेटसाठी नवा विक्रम जोडला गेला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळी आणि २,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो कपिल देव नंतरचा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सुपर ४ सामन्यात त्याने आपला २०० वा बळी मिळवला.

जाडेजाच्या (Ravindra Jadeja) नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२३ डावांमध्ये २,५७८ धावांची नोंद होती. तर शुक्रवारी प्रेमदासा स्टेडिअमवर शमीम हुसेनचा बळी मिळवत त्याने २०० चा आकडाही पार केला.

फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्याच्या भारतीय संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी उजवी आहे. कारण, २०० एकदिवसीय बळींचा टप्पा ओलांडणारा तो फक्त सातवा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी अनिल कुंबळे (३३७), जवागल श्रीनाथ (३१५), अजित आगरकर (२८८), झहीर खान (२८२) आणि कपिल देव (२५२) यांनीच अशी कामगिरी केली आहे. अशा दिग्गजांच्या पंक्तीत आता जाडेजा जाऊन बसला आहे.

(हेही वाचा – Diabeties : बटाट्यासारखी दिसणारी ही भाजी रक्तातील साखर कायमची संपवेल)

कपिल देव यांना त्यांच्या कारकीर्दीत एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी तुलनेनं कमी मिळाली. पण, त्यांनी २२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने २५३ बळी मिळवले. तर फलंदाजीत त्यांनी २३ धावांच्या सरासरीने ३,७८३ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर १ शतक आणि १४ अर्धशतकं आहेत.

दरम्यान रवी जाडेजाचा दोनशेवा बळी तुम्ही इथं पाहू शकता 

दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर २६६ धावांचं आव्हान आहे. ४ गडी ५० धावांच्या आसपास बाद झालेले असताना कर्णधार शकील हसनच्या ८० घावांच्या जोरावर बांगलादेशने अडिचशेचा टप्पा पार केला. त्यानंतर भारताची सुरूवातही खराब झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.