रवींद्रसिंह जडेजा म्हणजे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळतो आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार देखील आहे. जडेजा हा डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज आणि संथ डावखुरा गोलंदाज आहे. २००८-२००९ रणजी करंडकामध्ये त्याने प्रभावशाली खेळ सादर केला. जानेवारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.
रविंद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ नवागम-खेड सौराष्ट्र येथे झाला. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात ८ फेब्रुवारी २००९ रोजी मालिकेच्या अंतिम सामन्यात झाली ज्यामध्ये त्याने ६० धावा केल्या. मात्र भारत हा सामना हरला.
युसूफ पठाण फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा २००९ च्या उत्तरार्धात जडेजाने (Ravindra Jadeja) त्याच्या जागी वनडे संघात सातव्या क्रमांकावर स्थान मिळवले. २१ डिसेंबर २००९ रोजी, जडेजाला कटक येथे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट घेतल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ३२-४ अशी आहे.
जडेजा २००६ आणि २००८ मध्ये भारतासाठी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक खेळला होता. त्याच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे भारताला अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक २००८ च्या अंतिम फेरीत विजय मिळाला. आजही रविंद्र जडेजा क्रिकेट खेळतोय. यंदाच्या विश्वचषकातही तो दिसला होता.
Join Our WhatsApp Community