Ravindra Jadeja : ३०० बळी आणि ३,००० कसोटी धावा जमवणारा रवींद्र जडेजा सगळ्यात वेगवान क्रिकेटपटू 

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने या बाबतीत पाकिस्तानच्या इम्रान खानलाही मागे टाकलं आहे 

106
Ravindra Jadeja : ३०० बळी आणि ३,००० कसोटी धावा जमवणारा रवींद्र जडेजा सगळ्यात वेगवान क्रिकेटपटू 
Ravindra Jadeja : ३०० बळी आणि ३,००० कसोटी धावा जमवणारा रवींद्र जडेजा सगळ्यात वेगवान क्रिकेटपटू 
  • ऋजुता लुकतुके 

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा भारताचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. आता तो आशियातील सगळ्यात यशस्वी अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. कसोटीतील ३०० बळी आणि ३,००० धावांचा टप्पा पार करणारा तो सगळ्यात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या इम्रान खानला मागे टाकलं. रविवारीच आपला ३०० वा बळी त्याने मिळवला. ही त्याची ७४ वी कसोटी होती. यापूर्वी इम्रान खानने (Imran khan) ७५ कसोटींत हा टप्पा पार केला होता. तर कपिल देवने (Kapil Dev) या टप्प्यासाठी ८३ आणि रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) ८८ कसोटी घेतल्या होत्या.

(हेही वाचा- Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणे, सर्फराझ, श्रेयसच्या शतकांमुळे पहिल्या दिवसावर मुंबईचं वर्चस्व)

३५ वर्षीय रवींद्र जडेजाने जागतिक स्तरावरही आपली मोहोर उमटवली आहे. ३०० बळी आणि ३,००० कसोटी धावांच्या बाबतीत फक्त इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू इयॉन बॉथम त्याच्यापेक्षा पुढे आहे. त्याने ७२ कसोटींमध्ये ही मजल मारली होती. भारताचा गोलंदाजीचा प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलनेही जाडेजाच्या कामगिरीचं कौतुक केलं. ‘जडेजा हे एक पूर्ण पॅकेज आहे. एकतर तो स्वत:वर मेहनत घेतो. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही प्रकारात तो अव्वल आहे. त्यामुळे कुठल्याही संघात हवा हवासा वाटणारा तो खेळाडू आहे,’ असं मॉर्केल जाडेजाविषयी बोलताना म्हणाले. (Ravindra Jadeja)

जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये ३,१३० धावा आणि ३०३ बळी मिळवले आहेत. टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर त्याने टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. पण, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट तो खेळणार आहे. भारतीय संघ आता मायदेशात न्यूझीलंड संघाविरुद्ध ३ कसोटींची मालिका खेळेल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होईल. (Ravindra Jadeja)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.