IND vs WI : भारत – वेस्ट इंडिज मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक वाचा एका क्लिकवर!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन वनडे आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरूवात २२ जुलैला होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये किती सामने होणार हे सामने कुठे खेळवले जाणार आणि किती वाजता सुरू होणार याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे…

( हेही वाचा : मुंबई – पुणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! अनुभवता येईल निसर्गाचे विहंगम दृश्य)

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies ) या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होईल त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ या दोऱ्यातील अखेरच्या दोन लढती अमेरिकेत खेळणार आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी होणारी चौथी आणि पाचवी टी २० लढत अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. वनडे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत तर पाच टी२० सामने ८ वाजता सुरू होतील. वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले असून टी-२० सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करेल.

असा असेल भारताचा वेस्ट इंडिज दौरा

वनडे मालिका

  • पहिली वनडे – २२ जुलै
  • दुसरी वनडे – २४ जुलै
  • तिसरी वनडे – २७ जुलै

टी – २० मालिका वेळापत्रक

  • पहिली टी २० – २९ जुलै
  • दुसरी टी २० – १ ऑगस्ट
  • तिसरी टी २० – २ ऑगस्ट
  • चौथी टी २० – ६ ऑगस्ट
  • पाचवी टी २० – ७ ऑगस्ट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here