Rhythm Sangwan : नेमबाज रिदम सांगवान ऑलिम्पिकसाठी पात्र

पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती सोळावी भारतीय नेमबाज ठरली आहे. 

197
  • ऋजुता लुकतुके

इंडोनेशियात जाकार्ता इथं सध्या आशियाई स्तरावरील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा सुरू आहे. आणि या स्पर्धेतून युवा नेमबाज रिदम सांगवानने आपला ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून तिने ही किमया केली. एकंदरीत ही स्पर्धा भारतीय नेमबाजांसाठी लाभदायी ठरली असून आतापर्यंत ईशा सिंग, वरुण तोमर आणि आता रिदम सांगवानलाही ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे. (Rhythm Sangwan)

त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा संघ सहभागी होणार हे आता निश्चित आहे. यापूर्वी टोकयोमध्ये भारताकडून १५ जणांचा चमू खेळला होता. ती संख्या आताच १६ झाली आहे. (Rhythm Sangwan)

(हेही वाचा – Narendra Modi: नाशिकमध्ये नरेंद्र मोदींवर पुष्पवृष्टी, काळारामाचेही घेतले दर्शन)

२० वर्षीय रिदम सांगवानने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत २८ गुण मिळवले. पण, या प्रकारात सुवर्ण (यांग जिन. ४१) आणि रौप्य (किम येजी, ३२) मिळवणाऱ्या दोघी ऑलिम्पिक खेळण्यासाठी अपात्र होत्या. त्यामुळे कांस्य मिळवलेल्या रिदमला ती संधी मिळाली. (Rhythm Sangwan)

या कामगिरीमुळे आशियाई पात्रता स्पर्धेत रिदमच्या पदकांची संख्या आता ३ झाली आहे. यापूर्वी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिने कांस्य जिंकलं आहे. तर १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरीतही तिने रौप्य जिंकलं आहे. (Rhythm Sangwan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.