-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी वर्षाला किती आयकर भरला यावरून आपल्याला त्यांच्या मिळकतीची कल्पना येऊ शकते. आणि कमाईही कोट्यवधीच्या घरात असलेल्या या लोकांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आयकरही कोटींमध्ये भरला आहे. क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक म्हणजे ६६ कोटी रुपये आयकराच्या रुपात भरले आहेत. आणि सर्वाधिक आयकर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. (Rich Indian Cricketers)
किंग खान शाहरुख खानने ९२ कोटी रुपये, तमिळ अभिनेता विजयने 80 कोटी रुपये, सलमान खानने ७५ कोटी रुपये आणि अमिताभ बच्चनने ७१ कोटी रुपये कर भरला आहे. तर क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक कर भरला आहे. त्यानंतर एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि हार्दिक पांड्याचा यादीत समावेश आहे. एमएस धोनीने ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. तर सचिन तेंडुलकरने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Rich Indian Cricketers)
(हेही वाचा – Teacher’s Day 2024 : का साजरा केला जातो शिक्षक दिन? आणि काय आहे महत्त्व ?)
कर भरणाऱ्यांच्या यादीत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे, ज्याने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यांच्याशिवाय सौरव गांगुलीने २३ कोटी रुपये, हार्दिक पांड्याने १३ कोटी रुपये आणि ऋषभ पंतने १० कोटी रुपयांचा मोठा कर भरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा मात्र या यादीत पहिल्या २० सेलिब्रिटींच्या यादीत समावेश नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Rich Indian Cricketers)
विराट कोहली – 66 कोटी
एमएस धोनी – 38 कोटी
सचिन तेंडुलकर – 28 कोटी
सौरव गांगुली – 23 कोटी
हार्दिक पांड्या – 13 कोटी
(हेही वाचा – Hindus in Bangladesh : बांगलादेशात पोलीस ठाण्यातच झाली हिंदु युवकाची हत्या)
विराट कोहलीची कमाई कुठून होते?
विराट कोहली (Virat Kohli) बीसीसीआयच्या ए प्लस श्रेणीमध्ये येतो, ज्यासाठी त्याला वार्षिक ७ कोटी रुपये वेतन मिळते. याशिवाय तो एमआरएफ कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. कपड्यांच्या ब्रँड प्यूमासोबत विराट कोहलीने करार केला आहे. इतर प्रायोजक आणि शूटिंग जाहिरातीमधूनही विराट कोहलीची दमदार कमाई आहे.
सचिनची एकूण संपत्ती सुमारे १७० दशलक्ष डॉलर्स म्हणजे १४१० कोटी रुपये आहे. निवृत्तीनंतरही सचिन दर महिन्याला जाहिराती आणि इतर माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करत आहे. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीला एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी तो अजूनही जाहिरातींच्या जगतात वर्चस्व गाजवत आहे. आजही मास्टर ब्लास्टर मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये चौकार-षटकार मारताना दिसतो. एका वेबसाइटनुसार, सचिन तेंडुलकरचे मासिक उत्पन्न ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्याचे वार्षिक उत्पन्न ५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सचिन अनेकदा टीव्हीवर अपोलो टायर्स, आयटीसी सॅव्हलॉन, जिओ सिनेमा, स्पिनी आणि एजस फेडरल लाइफ इन्शुरन्ससारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसतो. सचिनला जाहिरातींमधून वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये मिळतात, तर गुंतवणुकीतून १० कोटी रुपये कमावतात. त्यांचे मुंबई आणि केरळमध्ये आलिशान बंगले आहेत. (Rich Indian Cricketers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community